-
ऋजुता लुकतुके
विराट कोहलीला आताच क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू मानलं जातं. ३०,००० च्या वर आंतरराष्ट्रीय धावा त्याने केल्या आहेत. त्याचं श्रेय जातं कोहलीची तंदुरुस्ती आणि त्याच्यातील सातत्य. या त्याच्या स्वभावाचे आणखी काही पैलू उघड करणारा पत्नी अनुष्का शर्माचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात विराटने गेली काही वर्षं आहार आणि व्यायामावर घेतलेली मेहनतच अनुष्काने लोकांसमोर ठेवली आहे. ‘मागच्या १० वर्षांत विराटने बटर चिकनही नाही खाल्लेलं. झोपेच्या बाबतीतही तो काटेकोर असतो. या गोष्टी आपल्या हातात आहेत. तितक्या तर आपण करूच शकतो, असं त्याचं यावर मत आहे,’ असं अनुष्काने म्हटलं आहे. (Virat Kohli)
इतकंच नाही तर पुढे अनुष्काने विराटचं दैनंदिन आयुष्य कसं असतं ते ही सांगितलं आहे. ‘तंदुरुस्ती आणि सराव यांच्या बाबतीत विराट १०० टक्के शिस्त पाळतो. सकाळी सगळ्यांच्या आधी उठून तो कार्डिओ किंवा हिट प्रकारातील व्यायाम करत असतो. त्यानंतर तो क्रिकेटच्या सरावाला सुरुवात करतो. कुठल्याही प्रकारचं जंक फूड तो खात नाही. गेल्या कित्येक वर्षांत तो शीतपेय प्यालेला नाही. आणि झोपेच्या वेळा तर तो कधीच चुकवत नाही. इतकं सगळं तू कसं पाळतोस, असा प्रश्न विचारला तर म्हणतो, हे तर आपल्या हातात आहे,’ असं अनुष्का या व्हीडिओत म्हणते. (Virat Kohli)
Anushka Sharma On Kohli’s fitness secret pic.twitter.com/uuikcqRYWB
— Noor (@HeyNoorr) December 4, 2024
कोहलीच्या शिस्तीची खरंच उदाहरणं दिली जातात. कारण, आतापर्यंत क्रिकेट कारकीर्दीत त्याने फक्त दोनदा आपला फॉर्म हरवला आहे. एरवी तो सातत्यपूर्ण खेळासाठीच प्रसिद्ध आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्या १८ वर्षांच्या कारकीर्दीत तो दुखापतीमुळे एकदाही संघाबाहेर राहिलेला नाही. (Virat Kohli)
(हेही वाचा- Deputy Chief Minister : ‘उपमुख्यमंत्री’पदाची घटनेत तरतूद आहे का ?)
यावर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी तो खराब फॉर्ममध्ये होता. बांगलादेश तसंच न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत तो १० डावांत मिळून फक्त १०२ धावा करू शकला होता. पण, ऑस्ट्रेलियात पर्थ कसोटीत दुसऱ्या डावात १०० धावा करत त्याने फॉर्मची चुणूक दाखवून दिली आहे. परदेशात एकाच भूमीवर सर्वाधिक १० शतकं करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. मालिकेत आणखी एक शतक झालं तर तो या बाबतीत अगदी सर डॉन ब्रॅडमन यांनाही मागे टाकू शकेल. (Virat Kohli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community