- ऋजुता लुकतुके
३६ वर्षीय विराट कोहली (Virat Kohli) गेली काही वर्षं क्रिकेटच्या मैदानावर नुसता उतरला तरी एखादा नवीन विक्रम होतो. नुकतंच पाकिस्तान विरुद्ध त्याने आपलं ५१ वं एकदिवसीय शतक ठोकलं. आणि सगळ्यात वेगाने १४,००० एकदिवसीय धावाही पूर्ण केल्या. पण, सगळ्यात मोठा विक्रम त्याला खुणावतोय तो सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) आंतरराष्ट्रीय शतकांच्या शंभरीचा. सध्या त्याच्या नावावर ८२ आंतरराष्ट्रीय शतकं आहेत. आणि सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी त्याला आणखी १८ शतकं हवी आहेत.
अशावेळी भारताची माजी सलामीवीर वसिम जाफर (Wasim Jaffer) विराटच्या मागे भक्कम उभा राहिला आहे. सचिनचा विक्रम तो नक्कीच मोडू शकतो, असं वसिमला वाटतं. ‘विराटचा खेळ बघताना तुम्ही त्याच्या प्रेमात पडता. आणि तो कधी बाद व्हावा असं तुम्हाला वाटतच नाही. पाकविरुद्ध तो ज्या फॉर्ममध्ये होता, तेव्हाही मनात तीच भावना होती. मला खात्री आहे, विराट (Virat Kohli) आणखी ३-४ वर्षं खेळेल. यात तो फलंदाजीचे सारे विक्रम मोडेल,’ असं वसिम विराटविषयी बोलताना म्हणाला.
(हेही वाचा – Navi Mumbai Airport ‘या’ तारखेपासून उड्डाणे सुरु होणार ?; सुविधांची झाली तपासणी)
कुणी १०० शतकांचा विक्रम करेल, असं कधी वाटलं नव्हतं. पण, सचिनने केला. आता सचिनचा विक्रमही कधीतरी मोडेल असं वसिमला वाटतं. ‘सचिनने १०० आंतरराष्ट्रीय शतकं केली तेव्हाही असंच वाटलं, इतकी शतकं पुढे कोण करणार? पण, २०१० पासून विराट (Virat Kohli) क्रिकेटच्या क्षितिजावर उगवला. आणि तो ज्या पद्धतीने खेळतोय, तो शतकांचा विक्रम नक्कीच मोडू शकेल,’ असं वसिम जाफर (Wasim Jaffer) म्हणाला.
विराटची धावांची भूक आणि खेळातील तंदुरुस्ती कायम असल्यामुळे तो अजून ३-४ वर्षं खेळेल असं वसिम जाफरबरोबरच दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हर्शेल गिब्जलाही (Herschelle Gibbs) वाटतं. आणि त्याचबरोबर रोहित आणि विराटनंतर भारतीय फलंदाजी शुभमन आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) पुढे नेतली असा विश्वासही दोघांनी व्यक्त केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community