विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड! सचिनलाही टाकले मागे, श्रीलंकेविरुद्ध कोहलीचे ४५ वे शतक

116

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेला मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. शुभमन गिल आणि रोहित शर्माच्या दमदार फटकेबाजीनंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानात आला. विराटने श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. विराटने वेगाने १२ हजार ५०० धावा पूर्ण करत श्रीलंकेविरुद्ध आपले ४५ वे शतक केले आहे.

( हेही वाचा : एलाॅन मस्क यांनी गमावले तब्बल 180 अब्ज डॉलर्स; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद)

वनडेमध्ये ४५ वे शतक

विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध वनडेमधील आपले ४५ वे शतक पूर्ण केले आहे. यासोबतच त्याने बऱ्याच विक्रमांना सुद्धा गवसणी घातली आहे. विराटने ७९ चेंडूत दणदणीत शतकपूर्ती केली.

विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड 

विराटने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने आपल्या १२ हजार ५०० धावा पूर्ण केल्या आहेत. वेगवान धावा करत विराटने नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. त्याने २५७ इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडला आहे. सचिन तेंडुलकरने ३१० डावांमध्ये १२५०० धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर रिकी पॉंटिंग ( ३२८), कुमार संगकारा ( ३४५), सनथ जयसूर्या (४०२) आणि महेला जयवर्धने ( ४११) या खेळाडूंचा क्रमांक लागतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.