IPL 2025, MI vs RCB : विराट, फील सॉल्टना आव्हान बुमराहच्या पहिल्या चेंडूंवर चौकार किंवा षटकार ठोकण्याचं

IPL 2025, MI vs RCB : विराट, फील सॉल्टना आव्हान बुमराहच्या पहिल्या चेंडूंवर चौकार किंवा षटकार ठोकण्याचं

47
IPL 2025, MI vs RCB : विराट, फील सॉल्टना आव्हान बुमराहच्या पहिल्या चेंडूंवर चौकार किंवा षटकार ठोकण्याचं
IPL 2025, MI vs RCB : विराट, फील सॉल्टना आव्हान बुमराहच्या पहिल्या चेंडूंवर चौकार किंवा षटकार ठोकण्याचं

 

ऋजुता लुकतुके

सोमवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) हे संघ आमने सामने येतील. यात प्रामुख्याने दोन उपलढती महत्त्वाच्या असतील. एक म्हणजे रोहीत शर्मा विरुद्ध विराट कोहली. आणि दुसरी रंगतदार लढत असेल ती विराट कोहली विरुद्ध जसप्रीत बुमराह. सुरुवातीच्या षटकांमध्ये बुमराहचा मुकाबला विराट आणि त्याचा सलामीचा साथीदार फील सॉल्ट कसे करतात, याकडे संघातील प्रत्येकाचं लक्ष असेल. बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे जवळ जवळ ३ महिने बाहेर होता. आता तो पुनरागमन करतोय. आणि अशावेळी ही लढत आणखी रंगतदार होणार आहे. (MI vs RCB)

हेही वाचा-IPL 2025 : MI vs RCB सामन्यापूर्वी विराट कोहलीचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत !

यापूर्वी टीम डेव्ही हा ऑस्ट्रेलियन खेळाडू मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. आता तो बंगळुरूच्या संघात आहे. त्यामुळे नेट्समध्ये बुमराबरोबर केलेला सराव आता त्याला उपयोगी पडेल असा होरा आहे. आताही टीम डेव्ही शेवटच्या षटकांमध्ये बुमराला सामोरा जाईल. अशावेळी बुमराहला खेळायची नेमकी रणनीती काय असा प्रश्न त्याला विचारला जात आहे. कारण, तो मुंबईच्या नेट्समध्ये बुमराला खेळला आहे. (MI vs RCB)

हेही वाचा- बँक खात्यांमध्ये एकूण जमा रकमेपैकी ३९.७% रकमेत महिलांचाच वाटा ; केंद्र सरकारने भारतातील ‘Women and Men in India 2024’ अहवाल केला जारी

त्यावर टीम डेव्ही म्हणतो, ‘बुमराकडे खूपच चांगला यॉर्कर आहे. त्यामुळे बुमराला खेळायचं असेल तर चवडा चेंडूच्या रेषेतून बाहेर घ्यायचा. आणि मग त्याच्या चेंडूची दिशा पकडायची. मूळात समोर आव्हान असं तगडं असेल तर तुमच्यातही विजिगिषू वृत्ती जागृत होते. आणि जगातील सर्वोत्तम खेळाडूविरुद्ध चांगली कामगिरी करूनच तुम्ही स्वत:ला सिद्ध करू शकता. त्यामुळे हे आव्हान स्वीकारायला मला आवडेल,’ असं डेव्ही सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत म्हणाला. (MI vs RCB)

हेही वाचा- Uttar Pradesh मध्ये १० मुसलमानांनी केली घरवापसी

डेव्ही २०२२ ते २०२४ अशी तीन वर्षं मुंबई इंडियन्समधून खेळला आहे. त्यामुळे बुमराविरुद्ध चांगली सुरुवात त्याला महत्त्वाची वाटते. ‘स्पर्धेत पुढे वाटचाल करायची असेल तर आम्हाला सर्वोत्तम संघांना हरवावं लागेल. आणि त्यासाठी आमची रणनिती अशीच आहे की, बुमराचा पहिलाच चेंडू चौकार किंवा षटकार वसूल झाला पाहिजे. ते जर विराट आणि फील सॉल्टला जमलं, तर बुमराचं आव्हान कठीण जाणार नाही,’ असं डेव्ही म्हणाला. या हंगामातील तीन सामन्यांत टीम डेव्हीने ५४ धावा केल्या आहेत. पण, त्याचा स्ट्राईक रेट २०६.६९ असा तगडा आहे. (MI vs RCB)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.