-
ऋजुता लुकतुके
अपेक्षेप्रमाणेच भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडकाचं (Champions Trophy) विजेतेपद पटकावलं. आणि मैदानावरच खेळाडूंचा जल्लोष सुरू झाला. त्याचवेळी लोकांच्या मनात २०२४ च्या टी-२० विश्वचषक विजेतेपदाच्या आठवणी ताज्या होत्या. तेव्हा विजेतेपदानंतर खेळाडूंचा जल्लोष एकीकडे सुरू असतानाच विराट, रोहित आणि जाडेजा यांनी एकामागून एक आपापली निवृत्ती जाहीर केली होती. मैदानावरच पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही गोष्ट उघड केली होती. आताही जेव्हा खेळाडूंचा जल्लोष सुरू होता, तेव्हा अशीच बातमी येणार की काय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) निवृत्तीची तर चर्चाही सुरू झाली होती. पण, दोघांनीही नंतर निवृत्तीची चर्चा फेटाळून लावली. त्याचवेळी आता रोहित आणि विराट यांच्यातील एक संवाद सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघं स्टंप हातात घेऊन दांडिया नृत्य करताना रोहित विराटला सांगतोय ती हिंदीतील वाक्य कॅमेराने टिपली आहेत. ‘भाई, हम कोई रियाटर नही हो रहे है। इनको लग रहा है,’ असं रोहित विराटला म्हणताना दिसतोय. (Virat, Rohit Not Retiring)
त्यानंतर रोहितने पत्रकार परिषदेतही ही गोष्ट स्पष्ट केली. ‘मी अजिबात निवृत्त होत नाहीए. उगीच निवृत्तीच्या चर्चा करू नका,’ असं रोहितने जवळ जवळ सुनावलंच. पुढे काय या प्रश्नाचं उत्तरही त्याने दिलं नाही. ‘जे सुरू आहे, तेच सुरू राहील,’ इतकंच तो म्हणाला. (Virat, Rohit Not Retiring)
(हेही वाचा – WFI Ban Lifted : क्रीडा मंत्रालयाने कुस्ती फेडरेशनवरील बंदी हटवली, संजय सिंग यांच्याकडे सूत्र)
“Hum koi retire nahi ho rahe hai bc…mkc inko toh lag raha hai!!”😭😭🤣🤣
~Just Rohit Sharma Things😭😭🙏🏽 pic.twitter.com/M6SawBWhQz— Megh (@endlessyappingg) March 9, 2025
चॅम्पियन्स करंडकानंतर (Champions Trophy) आता २२ मार्चपासून आयपीएलचा (IPL) अठरावा हंगाम सुरू होत आहे. आणि खेळाडू आपापल्या फ्रँचाईजीत सामील होणार आहेत. त्यामुळेच चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy) विजयानंतर कुठलाही सत्कार समारंभ मुंबईत होणार नाहीए. किंवा बसमधून मिरवणूकही होणार नाहीए. खेळाडू दुबईतून परतल्यावर आपापल्या गावी पोहोचले आहेत. तिथूनच आयपीएल फ्रँचाईजीत सामील होतील. (Virat, Rohit Not Retiring)
रोहित आणि विराटबरोबरच रवींद्र जाडेजानेही (Ravindra Jadeja) एकदिवसीय क्रिकेटमधून इतक्यात निवृत्त होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या तीनही ज्येष्ठ खेळाडूंनी चॅम्पियन्स करंडकातील (Champions Trophy) भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. रोहितने अंतिम सामन्यात महत्त्वपूर्ण ७६ धावा केल्या. तर विराटने अख्ख्या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करताना १ शतक आणि १ अर्धशतकासह २१८ धावा केल्या. जाडेजानेही अष्टपैलू कामगिरी बजावताना फलंदाजांना रोखण्याचं काम केलं. संघात ४ फिरकीपटू खेळवण्याची संघाची रणनीती दुबईत कमालीची यशस्वी ठरली. (Virat, Rohit Not Retiring)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community