Virat & Rohit : भारतीय संघात विराट आणि रोहितची जागा कोण घेणार?

Virat & Rohit : विराट, रोहितने टी २० मधून निवृत्ती घेतली असली तरी एकदिवसीय आणि कसोटीत ते खेळणार आहेत. 

74
Virat & Rohit : भारतीय संघात विराट आणि रोहितची जागा कोण घेणार?
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० प्रकारातून निवृत्ती घेतली असली तरी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये ते खेळणार आहेत. पण, अनुक्रमे ३५ आणि ३६ वर्षांचे असलेले हे खेळाडू आणखी किती काळ खेळू शकतील हा प्रश्नच आहे. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीची चर्चा तरीही होतेच. मग पुढचा प्रश्न असतो, भारतीय संघात त्यांची जागा कोण घेणार? भारताचा माजी अनुभवी लेगस्पिनर पियुष चावलाने आपल्या परीने या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. एका खाजगी पॉडकास्टमध्ये बोलताना त्याने विराटच्या जागी शुभमन गिल आणि रोहितच्या जागी ऋतुराज गायकवाडचं नाव घेतलं आहे. (Virat & Rohit)

(हेही वाचा – ICC Test Championship : अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला उर्वरित १० पैकी ‘इतक्या’ कसोटी जिंकाव्याच लागतील)

‘हे दोघेही खास खेळाडू आहेत,’ असं चावलाने बोलून दाखवलं. शुभमन गिलविषयी बोलताना चावलाने त्याच्या तंत्राकडे बोट दाखवलं. ‘विराटची जागा शुभमन घेऊ शकेल, कारण त्याचं तंत्र. ज्यांचं तंत्र चांगलं असतं अशा खेळाडूला खराब फॉर्म फार काळ सतावू शकत नाही. तंत्रशुद्ध फलंदाज खराब फॉर्ममधून लवकर बाहेर पडतो. तेच शुभमनच्या बाबतीत आहे,’ असं चावला म्हणाला. २५ वर्षीय शुभमन गिलला आतापासूनच भारताचा भावी कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. तो आतापर्यंत भारतासाठी २५ कसोटी, ४७ एकदिवसीय सामने आणि २१ टी-२० सामने खेळला आहे. कसोटींत त्याने १,४९२ धावा केल्या आहेत तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये २,३३८ धावा केल्या आहेत. तीनही प्रकारात मिळून ११ शतकं त्याच्या नावावर आहेत. (Virat & Rohit)

(हेही वाचा – Paris Paralympics 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींची पॅरालिम्पिक विजेत्यांशी भेट)

दुसरीकडे ऋतुराज गायकवाड हा भारतीय संघातील नियमित खेळाडू नाही. २७ वर्षीय गायकवाड भारतासाठी ६ एकदिवसीय आणि २३ टी-२० सामने खेळला आहे. यात त्याने अनुक्रमे ११५ आणि ६३३ धावा केल्या आहेत. कधी दुखापत तर कधी खराब फॉर्म यामुळे ऋतुराज गायकवाड नियमितपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकलेला नाही. पण, पियुष चावलाला त्याची काळजी वाटत नाही. ‘दुखापत किंवा संघात निवड न होणं हा खेळाचाच एक भाग आहे. हे सुरूच राहणार. पण, जेव्हा जेव्हा ऋतुराजला संधी मिळाली, तो एक वेगळाच खेळाडू भासला आहे. माझ्यासाठी हे दोन खेळाडू पुढेही खासच राहतील,’ असं चावला शेवटी म्हणाला. (Virat & Rohit)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.