Virat vs Gambhir : विराट आणि गंभीर यांच्यात आयपीएल दरम्यान नेमकं काय झालं होतं?

Virat vs Gambhir : २०२३ च्या आयपीएलमध्ये गंभीर आणि विराट यांच्यात मोठी शाब्दिक चकमक झाली होती 

157
Virat vs Gambhir : विराट आणि गंभीर यांच्यात आयपीएल दरम्यान नेमकं काय झालं होतं?
Virat vs Gambhir : विराट आणि गंभीर यांच्यात आयपीएल दरम्यान नेमकं काय झालं होतं?
  • ऋजुता लुकतुके 

गौतम गंभीरची (Gautam Gambhir) मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक झाल्यापासून एका गोष्टीची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती – गंभीर आणि विराटचं (Virat vs Gambhir) जमेल का? कारण, विराट संघातील स्टार आणि अत्यंत महत्त्वाचा खेळाडू. तर गंभीर प्रशिक्षकाच्या महत्त्वाच्या भूमिकेत. सगळ्यांना आठवलं ते २०२३ च्या आयपीएल दरम्यान दोघांमध्ये झालेलं शाब्दिक भांडण. अर्थात, यंदाच्या आयपीएलमध्ये दोघांनी एकमेकांची गळाभेटही घेतली. पण, २०२३ चा प्रसंग इतक्यात विसरणंही शक्य नव्हतं.

ही सगळी चर्चा सुरू असतानाच लखनौ संघातील एक खेळाडू अमित मिश्राने (Amit Mishra) एका पॉडकास्ट कार्यक्रमात विराट आणि गंभीरमध्ये नेमकं काय झालं, हे सांगितलं आहे. भांडण लखनौमध्ये झालं असलं तरी कथेची सुरुवात बंगळुरूमध्ये झाल्याचं अमित मिश्रांचं म्हणणं आहे. ‘बंगळुरूमध्ये सामना संपल्यावर आवाज करणाऱ्या प्रेक्षकांकडे बघून गंभीरने तोंडावर बोट ठेवून त्यांना चूप बसण्याची खुण केली होती. तेव्हाचा गंभीरचा दृष्टिकोण बहुतेक विराटला आवडला नसावा. आम्हाला वाटलं, ते प्रकरण तिथे मिटलं असेल. पण, तसं झालं नाही. दोन्ही संघ लखनौला आमने सामने आले, तेव्हा विराटचा राग कायम होता,’ असं अमित मिश्राने म्हटलं आहे.  (Virat vs Gambhir)

(हेही वाचा- Photo Morphing करुन सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या माथेफिरूला तरुणीने दिला चोप)

पुढे मिश्रा (Amit Mishra) म्हणतो, ‘काही गोष्टी विराटला टाळता आल्या असत्या. पण, विराटने त्या टाळल्या नाहीत. काईल मायर्सशी त्याचं काही वाकडं नव्हतं. तरी त्याने मायर्सलाही शिविगाळ केली. तर नवीन उल हकशीही त्याची वादावादी झाली. या गोष्टी विराट टाळू शकला नाही,’ असं अमित मिश्रांचं म्हणणं आहे.  (Virat vs Gambhir)

मिश्राने विराटबरोबरची एक आठवणही तेव्हा सांगितली. ‘मी नवीन बरोबर फलंदाजी करत होतो. नवीन आणि विराटचा वाद सुरू झाला. मी मध्ये पडलो. आणि विराटला म्हटलं तू हे जास्त वाढवू नकोस, तर विराटने हे तू नवीनला सांग असं उत्तर मला दिलं,’ असं अमित मिश्रा पॉडकास्टमध्ये म्हणाला. सामना संपल्यानंतरही नवीन आणि विराट यांच्यातील वाद सुरूच राहिला. तेव्हा गंभीरने मध्ये पडून विराटला उलट उत्तर दिलं, असं मिश्राचं म्हणणं आहे.  (Virat vs Gambhir)

(हेही वाचा- Eastern Freeway Drunk Driving : कॉर्पोरेट वकील Janhvi Gadkar वर हत्येचा खटला चालवण्याची सरकारची मागणी)

त्या घटनेनंतर नवीन उल हक आणि विराट कोहली (Virat Kohli) अनेकदा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. आणि एकमेकांसोबत त्यांनी गप्पाही मारल्या आहेत. पण, अफगाण गोलंदाजाच्या मनात आता विराटबद्दल पूर्वीइतका आदर नसेल, असं अमित मिश्राचं म्हणणं आहे. (Virat vs Gambhir)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.