- ऋजुता लुकतुके
दिल्लीच्या नजफगडचा नवाब असलेला विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. संघाची अवस्था कशीही असली तरी तो आपल्या नैसर्गिक फलंदाजीवरच भरवसा ठेवायचा आणि त्यातच त्याला यश मिळत होतं. सेहवाग फलंदाजीला असेल तर सामन्यात षटकारांची आणि चौकारांची आतषबाजी असणार हे निश्चित होतं. नजफगडमध्ये एक पीठाची गिरण चालवणाऱ्या कुटुंबात त्याचा जन्म झाला आणि गल्लीत क्रिकेट खेळताना इतर हजारो भारतीयांप्रमाणे त्याने स्वप्न पाहिलं ते सचिन तेंडुलकर होण्याचं.
(हेही वाचा – Assembly Election 2024: लालपरी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज; ९ हजार बस निवडणूक कर्तव्यावर!)
सचिन तेंडुलकर आजारी होता म्हणूनच त्याला भारतासाठी खेळण्याची पहिली संधी मिळाली आणि या मालिकेत सचिनची जागा घेत त्याने पहिलं एकदिवसीय शतक ठोकलं. जागतिक क्रिकेटला विरेंद्र सेहवागची (Virender Sehwag) पहिली ओळख ही अशी झाली. सचिनच्या फलंदाजीची छाप विरेंद्रच्या फलंदाजीवरही होती आणि षटकार ठोकण्याची पद्धतही तशीच होती. फक्त त्यांचं प्रमाण सचिन पेक्षा जास्त होतं. विरेंद्र सेहवाग मैदानावर आला की, चाहत्यांची षटकाराची मागणी सुरू व्हायची. कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतकं करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
(हेही वाचा – Border-Gavaskar Trophy 2024 : ऑस्ट्रेलियातील सराव सामना रद्द करण्यावरून गावस्करांनी टोचले भारतीय संघाचे कान)
सेहवाग (Virender Sehwag) भारतासाठी १०४ कसोटी सामने खेळला आणि यात त्याने तब्बल ९१ षटकार ठोकले. तर २५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने १३६ षटकार ठोकले आहेत. टी-२० सामन्यात त्याच्या नावावर १६ षटकार आहेत. असे एकूण २४२ षटकार त्याच्या नावावर आहेत. तर तीनही प्रकारात मिळून त्याच्या नावावर ३,००० च्या आसपास चौकार आहेत. पुढे जाऊन विरेंद्र सेहवागची षटकार खेचण्याची शैली युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेटमध्ये उचलली. आणि आता रोहित शर्माने सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावावर करण्यापर्यंत मजल मारली आहे. त्याच्या नावावर तर ६२४ षटकार आहेत. तीनही प्रकारात मिळून सर्वाधिक षटकार ठोकणारे पहिले पाच भारतीय पाहूया,
हेही पहा –
Join Our WhatsApp Community