Virendra Sehwag : विरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचं दिल्लीसाठी पदार्पण

48
Virendra Sehwag : विरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचं दिल्लीसाठी पदार्पण
Virendra Sehwag : विरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचं दिल्लीसाठी पदार्पण
  • ऋजुता लुकतुके 

भारताचा माजी दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा (Virendra Sehwag) मुलगा आर्यवीर सेहवागने (Aryavir Sehwag) दिल्लीसाठी विनी मंकड (Vinoo Mankad) करंडकात यशस्वी पदार्पण केलं आहे. मणिपूर विरुद्ध खेळताना आर्यवीरने ४९ धावांची खेळी उभारली. १९ वर्षांखालील या देशांतर्गत स्पर्धेत आर्यवीरच्या कामगिरीमुळे दिल्लीला ६ गडी राखून दमदार विजय मिळवता आला. आर्यवीर सलामीलाच फलंदाजी करत असला तरी त्याची आणि वडिलांची शैली थोडी वेगळी आहे. आर्यवीरने ४९ धावा केल्या त्या ६४ चेंडूंत

(हेही वाचा- Women’s T20 World Cup 2024 : भारत – न्यूझीलंड सामन्यात अमेलिया केरला धावचीत का दिलं गेलं नाही?)

दिल्लीला विजयासाठी आवश्यक १६९ धावा करताना आर्यवीरने ३३ धावांची सलामी संघाला करून दिलीय या खेळीत त्याने १ षटकार आणि ६ चौकार लगावले. आर्यवीरने (Aryavir Sehwag) सुरुवातीला सार्थक रे बरोबर ३३ धावांची भागिदारी केली. त्यानंतर प्रणव पंत बरोबर तिसऱ्या गड्यासाठी ६१ धावांची भागिदारी करत दिल्लीला विजयाच्या जवळ नेलं. दोघांनी ६१ धावा केल्या त्या ६४ चेंडूंतच प्रणव पंतने सामन्यात ४५ चेंडूंतच ७५ धावांची खेळी केली. आर्यवीरचं अर्धशतक मात्र हुकलं (Virendra Sehwag)

१९ वर्षांखालील विनू मंकड स्पर्धा पुद्दुचेरी इथं सुरू आहे. या स्पर्धेसाठीच्या निवड चाचणी सामन्यात आर्यवीरने १३६ चेंडूतच १८६ धावा केल्या होत्या. मोठी खेळी करण्याची क्षमता आर्यवीरकडे असल्याचं बोललं जातं. (Virendra Sehwag)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.