ऋजुता लुकतुके
भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर (Chess Grandmaster) विश्वनाथन आनंद (Vishy Anand) हा बुद्धिबळाच्या पटावर आपली बुद्धिमत्ता दाखवून देतो, तसाच तो विनोदीही आहे. निवृत्तीनंतर बुद्धिबळ (Chess) खेळाकडे लहान मुलांना वळवल्यासाठी तो काम करतोय. अशा आनंदचं एक ट्विट शनिवारी खूप गाजलं आणि व्हायरल झालं. यात तो दोन लहान मुलींना उद्देशून म्हणत होता की, ‘मी विमानतळावर आहे. माझ्या अपहरणकर्त्यांना, मला सोडा.’ (Vishy Anand)
सोशल मीडियावर या ट्विटनंतर अर्थातच गोंधळ उडाला. आनंदला काही झालं का, अशी विचारणाही होऊ लागली. पण, काही वेळातच आनंदनेच याचा उलगडा केला. अलेक्झांड्रा आणि आंद्रिया बोतेझ या दोन तरुण बुद्धिबळपटू आहेत. आणि त्या सोशल मीडियासाठी बुद्धिबळावर आधारित कार्यक्रमही करतात. त्याचाच हा भाग होता. (Vishy Anand)
(हेही वाचा- Crime: पिंपरी-चिंचवड शहरात ४५ कोटींच्या ड्रग्ससह पोलीस फौजदाराला अटक)
दोघींनी आनंदला एक बुद्धिबळातील कोडं घातलं. आणि त्याचं उत्तर दिलंत तरंच तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला परत मिळेल, अशी धमकीही दिली होती. त्यामुळे पहिल्या ट्विटनंतर काही वेळाने आनंद म्हणतो, ‘अलेक्झांड्राने मला एक कोडं घातलं. आणि आंद्रिया म्हणाली, कोडं सोडवलं तरंच मला स्वातंत्र्य परत मिळेल. एक पट त्यांनी माझ्यासमोर ठेवला. आणि विचारलं, काळ्या मोहऱ्यांची पुढील चाल काय असली पाहिजे. मी सांगितलं, केडी५. आणि त्यांनी मला सोडलं!’ असं पुढे आनंद म्हणाला. (Vishy Anand)
Extra explanation: Since this is a race, black should play Kd5 Slowing the white king march to the Queen side
And a quicker hostage release!— Viswanathan Anand (@vishy64theking) March 1, 2024
हा बुद्धिबळाचा नियमित डाव नाहीए. तर ही रेस म्हणजे शर्यत आहे. आणि इथे दुसऱ्याला आगेकूच करण्यापासून रोखण्याचं आव्हान आहे. अशा ऑनलाईन कोड्यांमध्ये सध्या आनंद व्यस्त असतो. बुद्धिबळातील तरुण पिढीचं त्याने कौतुक केलं आहे. (Vishy Anand)
(हेही वाचा- Crime: पिंपरी-चिंचवड शहरात ४५ कोटींच्या ड्रग्ससह पोलीस फौजदाराला अटक)
‘ही तरुण मुलं विशीच्या आतली आहेत. आणि आताच त्यांच्याकडे २७०० च्या वर एलो रेटिंग आहे. म्हणूनच ही सुवर्णपिढी आहे. पुढची १० वर्षं तेच बुद्धिबळावर राज्य करणार आहेत. त्यांचा मार्गदर्शक, प्रतिस्पर्धी असं सगळं व्हायला मला आवडेल,’ असं आनंद म्हणाला होता. (Vishy Anand)
विश्वनाथन आनंद (Vishy Anand) स्वत: ५ वेळा जगज्जेता आहे. आणि भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर (India’s first International Grandmaster) असण्याबरोबरच तो पहिला नंबर वन खेळाडू आणि आतापर्यंत भारताचा अव्वल खेळाडू असण्याचा मान राखणारा खेळाडू आहे. अगदी अलीकडे प्रग्यानंदाने रेटिंगमध्ये त्याला मागे टाकलं. तोपर्यंत रेटिंगमध्ये तो सर्वोत्तम भारतीय होता. (Vishy Anand)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community