Viswanathan Anand : कार्लसन आणि फिडे यांच्यातील वादामुळे आनंदने फ्रीस्टाईल बुद्धिबळ स्पर्धेतून घेतली माघार

Viswanathan Anand : या स्पर्धेत आनंद आणि गुकेश यांचा मुकाबला बघायला मिळणार होता. 

32
Viswanathan Anand : कार्लसन आणि फिडे यांच्यातील वादामुळे आनंदने फ्रीस्टाईल बुद्धिबळ स्पर्धेतून घेतली माघार
  • ऋजुता लुकतुके

पाचवेळा बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकावलेल्या भारताच्या विश्वनाथन आनंदने (Viswanathan Anand) फ्रीस्टाईल बुद्धिबळ स्पर्धेतून ऐनवेळी माघार घेतली आहे. त्यामुळे चाहत्यांना विश्वनाथन आनंद विरुद्ध डी गुकेश अशी लढत पाहता येणार नाही. आनंदने शेवटच्या क्षणी स्पर्धेतून माघार घेतल्याचं स्पर्धेच्या वेबसाईटवर नमूद करण्यात आलं आहे.

फ्रीस्टाईल बुद्धिबळ स्पर्धेची ही वर्षभराची टूअर रंगणार आहे आणि यातील पहिली स्पर्धा पुढील महिन्यात जर्मनीत होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजकांपैकी एक आहे मॅग्नस कार्लसन आणि कार्लसनने अलीकडेच बुद्धिबळ खेळाची जागतिक संघटना फिडेशी वाद उकरून काढला आहे. तर आनंद (Viswanathan Anand) सध्या फिडेचा उपाध्यक्ष आहे. त्यामुळे कार्लसन विरुद्ध फिडे असा वाद या आठवड्यात सुरू झाल्यावर आनंदने ही भूमिका घेतल्याचं दिसतंय.

(हेही वाचा – आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे Shubanshu Shukla ठरले पहिले भारतीय ; NASA ची माहिती)

ही स्पर्धा १० निमंत्रित बुद्धिबळपटूंची स्पर्धा असणार आहे. भारताचा डी गुकेश अजूनही या स्पर्धेत खेळणार आहे. आता आनंदच्या जागी उझबेकिस्तानच्या १९ वर्षीय यावोखीर सिंदारोव्हचा समावेश करण्यात आला आहे. फ्रीस्टाईल बुद्धिबळ स्पर्धा हा सध्याच्याच काही बुद्धिबळपटूंनी घेतलेला पुढाकार आहे. पण, फिडेबरोबर त्यांचा वाद सुरू आहे. स्पर्धेच्या विजेत्याला विश्वविजेता असा खिताब देण्यात येणार आहे आणि फिडेला हे अमान्य आहे.

मॅग्नस कार्लसनसह अनेक खेळाडूंनी फिडेचा निषेध केला आहे. हिकारू नाकामुरानेही फिडेविरुद्ध बंड पुकारलं आहे. इतकंच नाही तर फ्रीस्टाईल बुद्धिबळ स्पर्धेला मान्यता देण्यासाठी फिडेनं ५,००,००० अमेरिकन डॉलरची मागणी केल्याचा आरोपही अलीकडेच या स्पर्धेच्या आयोजकांनी केला होता. बुद्धिबळ संघटनेला वाद नवीन नाहीत. यापूर्वीही खेळाडूंनी संघटनेपासून वेगळं होऊन स्वतंत्र संघटना सुरू केल्याची अनेक उदाहरणं आहेत. पण, सध्या मॅग्नस कार्लसन बरोबरच फिडेचा सुरू असलेला वाद विकोपाला गेला आहे. (Viswanathan Anand)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.