- ऋजुता लुकतुके
पाचवेळा जगज्जेता ठरलेल्या विश्वनाथन आनंदने (Viswanathan Anand) लिऑन मास्टर्सच्या अंतिम फेरीत जेम सँतोस लतासाचा ३-१ ने पराभव करत विक्रमी दहाव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. २८ वर्षांपूर्वी १९९८ मध्ये आनंदने ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकली होती. आता आनंद ५४ वर्षांचा आहे. या स्पर्धेत यंदा चार खेळाडूंनी भाग घेतला होता. आनंद आणि अर्जुन एरिगसी हे दोघे भारतीय आणि आनंदचा जुना प्रतिस्पर्धा व्हेसेलिन तोपोलोव्हही यंदा स्पर्धेत होता. (Viswanathan Anand)
प्रत्येक फेरीत चार डाव खेळवण्यात आले. एका डावासाठी प्रत्येक खेळाडूला २० मिनिटं देण्यात आली. प्रत्येक चालीनंतर यात दहा सेकंदांची वाढ होणार होती. पहिल्या उपांत्य सामन्यात आनंदने तोपोलोव्हचा पराभव केला. तर भारताचा दुसरा खेळाडू अर्जुन एरिगसीचा सांतिओस लतासाने अडीच विरुद्ध दीड गुणांनी पराभव केला. त्यामुळे अंतिम फेरीत आनंदचा मुकाबला सांतोश लतासाशी होता. तर आनंदने उपान्त्य फेरीच्या चार सामन्यांतील तिसरा काळ्या मोहऱ्यांनी जिंकला. आणि इतर तीन बरोबरीत सोडवले. त्यामुळे त्याचाही दीड विरुद्ध अडीच गुणांनी विजय झाला. (Viswanathan Anand)
No slowing down for Vishy!
Viswanathan Anand wins his 🔟th Leon Masters title after beating GM Jaime Santos 3-1 in the final! 🇮🇳♥️#Chess ♟️ pic.twitter.com/XPRMVXC5UL
— The Bridge (@the_bridge_in) July 1, 2024
(हेही वाचा – World Chess Championship : डिंग लिरेन आणि गुकेश मधील विश्वविजेतेपदाचा सामना अखेर सिंगापूरला)
अंतिम सामन्यात लतासाने आनंद विरुद्धही चांगलं आव्हान उभं केलं. पहिल्या डावात त्याने आनंदवर चांगलंच दडपण आणलं. तर दुसऱ्या डावाच्या मध्यावर तो एका प्याद्याने पुढे होता. पण, हे दोन्ही डाव बरोबरीत सोडवण्यात आनंदला यश आलं. मोहऱ्यांची कापाकापी करताना अखेरच्या टप्प्यात आनंद पुढे होता. तिसरा डाव मात्र आनंदने अगदी निर्विवाद जिंकला. इटालियन रणनीती आखताना आनंदने सुरुवातीपासून वर्चस्व राखलं. मग चौथ्या डावात कामगिरीची पुनरावृत्ती करताना त्याने हा डावही जिंकला. (Viswanathan Anand)
चौथ्या डावात दोघांनी अगदी सुरुवातीलाच राण्या एकमेकांना बहाल केल्या. त्यानंतर भक्कम खेळ करत आनंदने लतासाला संधी दिली नाही. ३७ चालींनंतर आनंदने लतासाला पराभव मान्य करण्यास भाग पाडलं. अखेर आनंदचा ३ विरुद्ध १ गुणांनी पराभव झाला. (Viswanathan Anand)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community