- ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघ झिंबाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे आणि या दौऱ्यात ५ टी-२० सामने होणार आहेत. विश्वचषक संपल्यावर लगेचच म्हणजे ६ जुलैला ही मालिका सुरू होत आहे. त्यामुळे या छोटेखानी मालिकेसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) आणि त्यांचा क्रिकेट अकादमीतील सहाय्यक चमू जाईल असा अंदाज आहे. विश्वचषक संपता संपता नवीन मुख्य प्रशिक्षकांची निवड होईल. त्यानंतर त्यांच्या सपोर्ट स्टाफचीही निवड जाहीर करण्यात येईल. या सगळ्या प्रक्रियेला वेळ देण्यासाठी नवीन प्रशिक्षक हे श्रीलंका दौऱ्यातच पदभार स्वीकारतील असं बोललं जात आहे. (VVS Laxman in Zimbabwe)
येत्या २-३ दिवसांत भारताचा झिंबाब्वे दौऱ्यासाठीचा संघ जाहीर होईल. सध्या भारताच्या युवा आणि होतकरु खेळाडूंचा एक संच बंगळुरूमध्ये क्रिकेट अकादमीत लक्ष्मण यांच्या हाताखालीच सराव करत आहे. त्यांच शिबीर तिथं सुरू आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर ज्येष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येईल. या कालावधीत युवा खेळाडूंना संधी मिळेल अशी शक्यता आहे. आणि लक्ष्मण सध्या याच खेळाडूंवर काम करत आहेत. (VVS Laxman in Zimbabwe)
(हेही वाचा – Heat Stroke: यंदाचा उन्हाळा ठरला रेकॅार्डब्रेक; राज्यात उष्माघाताचे किती रुग्ण?)
झिंबाब्वे दौऱ्यानंतर जुलैच्या मध्यावर भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात तीन टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने होणार आहेत. या दौऱ्यात नवीन प्रशिक्षक पदभार स्वीकारतील, असा अंदाज आहे. सध्या प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरच्या नावावची जोरदार चर्चा आहे. त्याप्रमाणे गंभीर प्रशिक्षक झाला तर तो आपला सपोर्ट स्टाफ आधी निवडेल आणि मग भारतीय संघाबरोबर त्यांच काम सुरू होईल. अपेक्षेप्रमाणे रोहित आणि विराट यांनी झिंबाब्वे दौऱ्यासाठी विश्रांती घेतली तर संघाचं नेतृत्व हार्दिक पांड्या किंवा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात येईल. (VVS Laxman in Zimbabwe)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community