- ऋजुता लुकतुके
मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडिअमचं हे पन्नासावं वर्षं आहे. त्या निमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनने या महिनाभरात अनेक कार्यक्रम इथं आयोजित केले होते. ५० व्या वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी एमसीएनं मैदानात १४,५०५ लाल व सफेद चेंडू वापरून केलेलं एक डिझाईन चक्क गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पोहोचलं आहे. मुंबई ही भारतीय क्रिकेटची पंढरी मानली जाते. त्यामुळे वानखेडे मैदानावर सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक भारतीय क्रिकेटपटूंची कारकीर्द घडली आहे. (Wankhede Stadium @50)
(हेही वाचा – Jammu and Kashmir: लष्करी छावणीवर दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार)
२०११ च्या ऐतिहासिक एकदिवसीय विश्वचषक विजयाचा जल्लोषही याच मैदानावर झाला आहे. खेळाडूंची ओपन बस यात्रा आणि त्यानंतर सत्कार हा कायम इथेच झाला आहे. त्यामुळे वानखेडे स्टेडिअमचं एक वेगळं महत्त्व भारतीय क्रिकेटमध्ये आहे आणि ते दर्शवणारं हे डिझाईन तयार करण्यात आलं होतं. (Wankhede Stadium @50)
‘क्रिकेटच्या खेळात सर्वात लांब वाक्य, आणि ते ही क्रिकेटचे चेंडू वापरून बनवण्याचा विक्रम मुंबई क्रिकेट असोसिएशनने केला आहे आणि त्यासाठी एमसीएचं नाव गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पोहोचलं आहे. हे सांगायला आम्हाला अत्यंत आनंद होत आहे,’ असं एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक यांनी म्हटलं आहे. (Wankhede Stadium @50)
(हेही वाचा – ICC Test Team of the Year : आयसीसीच्या २०२४ च्या सर्वोत्तम खेळाडूंच्या कसोटी संघात तिघे भारतीय)
MCA Creates New Guinness World Record
On January 23, the MCA proudly unveiled the “Largest Cricket Ball Sentence”—a stunning arrangement of 14,505 red and white cricket balls on the stadium’s field.#Wankhede50 #MCAhttps://t.co/AogmAkVnNc pic.twitter.com/YtFSKSb3ur— Bikash Chand Katoch (@BikashCkatoch) January 24, 2025
‘फिफ्टी ईयर्स ऑफ वानखेडे स्टेडिअम,’ असं वाक्य क्रिकेट चेंडूंचा वापर करून बनवण्यात आलं आहे. १९७५ मध्ये जानेवारी २३ ते २९ या कालावधीत वानखेडे स्टेडिअमवर पहिला कसोटी सामना भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असा रंगला होता. त्या सामन्यात एकनाथ सोळकर यांनी शतक झळकावलं होतं. त्यामुळे एकनाथ सोळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा ५० वा वर्धापन सोहळा एमसीएकडून राबवण्यात येत आहे. ‘एकनाथ सोळकर आणि मुंबई क्रिकेटची सेवा केलेल्या आणि आज हयात नसलेल्या क्रिकेटपटूंच्या स्मृतीप्रत्यर्थ,’ असं या संदेशात लिहिलं आहे. (Wankhede Stadium @50)
१४,५०५ लाल व सफेद चेंडू या डिझाईनसाठी वापरण्यात आले. आता हे चेंडू क्रिकेटसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्था, गरजवंत खेळाडू तसंच शाळा व क्लबच्या खेळाडूंना दिले जाणार आहेत. (Wankhede Stadium @50)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community