-
ऋजुता लुकतुके
मेलबर्न कसोटीचा निकाल आता लागला आहे. आणि भारतीय संघाने तब्बल १८४ धावांनी ही कसोटी गमावण्याबरोबरच मालिकेतही १-२ अशी पिछाडी स्वीकारली आहे. कसोटीच्या पाचव्या दिवशी चहापानापर्यंत भारताची अवस्था ३ बाद ११२ अशी होती. आणि यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (Rishabh Pant) यांची जोडी बऱ्यापैकी जमली होती. जयस्वालने अर्धशतक केलेलं होतं. तर ऋषभ २७ धावांवर खेळत होता. भारताला विजयासाठी २२८ चेंडूंमध्ये २२८ धावांची गरज होती. कसोटी अनिर्णित राहण्याची शक्यता तेव्हा सर्वाधिक होती. कारण, उर्वरित ७ फलंदाजांना ५० षटकं खेळून काढणं मेलबर्नच्या खेळपट्टीवर कठीण वाटत नव्हतं.
पण, चहापानानंतर काही वेगळंच पाहायला मिळालं. दोन्ही भारतीय फलंदाज आपापले फटके स्वैरपणे खेळताना दिसले. आधी जयस्वालने मिचेल स्टार्क आणि कमिन्सचे डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारे फटके खेळण्याचा प्रयत्न केला. स्टार्कच्या एका षटकात त्याने असे ३ प्रयत्न केले. नशिबाने ते हुकले. आणि चेंडू बॅटला लागला नाही.
(हेही वाचा – Cyber Crime : App च्या मदतीने व्यावसायिकाची ३ कोटींची फसणूक)
दुसरीकडे, ऋषभ पंतने (Rishabh Pant) कामचलाऊ गोलंदाज ट्रेव्हिस हेडला (Travis Head) अंगावर घेण्याचं ठरवलं. त्याच्या दुसऱ्या षटकात जगातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या मैदानावर पंत लाँग ऑनचा षटकार खेचायला गेला. तिथे मिचेल मार्श (Mitchell Marsh) उभा होता. आणि पंत ३० धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजांची रीघ लागली. उर्वरित सात फलंदाज ४३ धावांत तंबूत परतले. ऋषभ पंतचा (Rishabh Pant) तो चुकलेला फटका पाहूया,
Travis Head gets Rishabh Pant and pulls out a unique celebration 👀#AUSvIND | #PlayOfTheDay | @nrmainsurance pic.twitter.com/EVvcmaiFv7
— cricket.com.au (@cricketcomau) December 30, 2024
सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने पंतसाठी रचलेला तो चक्रव्यूह होता. आणि पंत त्यात अडकला, अशी प्रतिक्रिया दिली. तर रोहित शर्माने (Rohit Sharma) पंतला संपूर्ण दोष दिला नाही. तरी काही गोष्टी त्याने समजून केल्या पाहिजेत, अशी समज दिली. ‘आम्ही कुणी पंतला सांगण्यापेक्षा त्याने स्वत: हे समजून घेतलं पाहिजे की, संघाची गरज काय आहे? यापूर्वी त्याच्या शैलीने आम्हाला विजय मिळवून दिला आहे. पण, यावेळी माझ्या मनात संमिश्र भावना आहेत,’ असं उत्तर पंतच्या बळीवर ऋषभने (Rishabh Pant) दिलं.
(हेही वाचा – डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशभरात शोक; Rahul Gandhi मात्र नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परदेशात; भाजपाकडून टीका)
म्हणजेच, रोहितला पंचने असा बेजबाबदार फटका खेळणं मान्य नव्हतं. पण, मूळात फलंदाजांनी चहापानानंतर नेमकी काय रणनीती ठेवायची, म्हणजे २२८ धावांचा पाठलाग करायचा की, कसोटी अनिर्णित ठेवण्याचा महत्त्व द्यायचं, याविषयी रोहित काही स्पष्ट बोलला नाही. कारण, जयस्वाल आणि पंत या दोघांनीही चहापानानंतर बेजबाबदारी फटकेबाजी सुरू केली होती. चहापानाला या दोघांशी रोहित आणि गंभीर यांनी नक्की चर्चा केली असणार. उरलेले २ तास खेळून काढा, असं संघाने सांगितलं असताना दोघांनी फटकेबाजी केली असेल तर ते गंभीर आहे. संघाने विजयासाठी प्रयत्न करा किंवा तुमचा नैसर्गिक खेळ करा, असं सांगितलं असेल तर संघ प्रशासनानेच त्यांना फटकेबाजीची मुभा दिली, असा त्याचा अर्थ होतो. आणि दोघंही नैसर्गिक आक्रमक खेळाडू आहेत. त्यामुळे रोहितने किंवा गंभीरने पुढे येऊन ही गोष्ट स्पष्ट केली पाहिजे.
या कसोटीत शुभमन गिलला वगळणं, सुंदर – जाडेजाला पहिली ५० षटकं गोलंदाजी न देणं, अशा अनेक तांत्रिक चुका आधीच घडल्या आहेत. त्यातच आता फलंदाजांना नीट इशारा न देणं ही संघ प्रशासनाचीच चूक मानली पाहिजे. नाहीतर, चहापानापूर्वी यशस्वी कधीही आक्रमक फटका खेळला, तर त्याला पंत शांत करत होता. तोच पंच अचानक फटकेबाजी का करायला लागला? यशस्वीने मिचेल स्टार्कच्या एका षटकात तीनदा ड्राईव्हचा प्रयत्न केला, तेव्हाच बारावा खेळाडू मैदानात पाठवून दोघांना समज का देण्यात आली नाही, असे प्रश्नही उभे राहतात. आणि मग असं वाटतं की, चूक एकट्या ऋषभ पंतची (Rishabh Pant) नसावी.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community