आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या एकदिवसीय सामान्यांच्या विश्वविजेतेपदाचा षटकार लगावला आहे. भारताचा ६ विकेट राखून पराभव करून ऑस्ट्रेलियाने या विश्वचषकामध्ये अभूतपूर्व विजय मिळवला. १९७५ पासून ऑस्ट्रेलियाने १९८७, १९९९, २००३, २००७, २०१५ असे पाच वेळा विश्वचषक पटकावला होता. आता ऑस्ट्रेलियाने २०२३मध्ये विजय मिळवत विश्वविजेता होण्याचा षटकार मारला आहे. (PM Narendra Modi)
(हेही वाचा – ICC Cricket World Cup : भारताचे स्वप्न भंगले; ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेतेपदाचा ‘षटकार’)
तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्याची भारताची संधी हुकली
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले. हा सामना जिंकून भारतीय संघाला तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची संधी होती. दोन्ही संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात २० वर्षांनी आमनेसामने आले होते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने उत्तम खेळ करत हा अंतिम सामना जिंकला. (PM Narendra Modi)
(हेही वाचा – ICC Cricket World Cup : १९७५ – २०२३ क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार)
“आम्ही आज आणि सदैव तुमच्यासोबत”
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक केले आहे. पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले. “प्रिय टीम इंडिया, विश्वचषक स्पर्धेत तुमची कामगिरी आणि जिद्द वाखाणण्याजोगी होती. तुम्ही उत्तम खेळ करत देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. आम्ही आज आणि सदैव तुमच्या सोबत आहोत.” असं म्हणत मोदींनी (PM Narendra Modi) भारतीय संघाचं कौतुक केलं आहे.
Dear Team India,
Your talent and determination through the World Cup was noteworthy. You’ve played with great spirit and brought immense pride to the nation.
We stand with you today and always.
— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2023
हेही पहा –
Join Our WhatsApp Community