![](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-9-1-696x377.webp)
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला बुधवार (१९ फेब्रुवारी) पासून सुरवात होणार आहे. या स्पर्धेत २३ फेब्रुवारी रोजी दुबई भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने असतील. आम्ही चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy) जिंकली नाही तरी चालेल, पण भारताला हरवणे अधिक महत्त्वाचे आहे, असे विधान नुकतेच पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी केले होते. मात्र याच प्रश्नावर पाकिस्तान संघाचा उपकर्णधार सलमान अली आगा (Salman Ali Agha) याने उत्तर दिले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या (PCB) पॉडकास्टवरील चर्चे दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघाचा उपकर्णधार सलमान अली आगा (Salman Ali Agha) याने माजी क्रिकेटपटूनी केलेल्या विधानावर उत्तर देत म्हणाला की, ‘भारताकडून हरणे आणि नंतर जेतेपद जिंकणे ही एक मोठी कामगिरी असणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेचा गतविजेता आहे, त्यांनी शेवटचा ट्रॉफी २०१७ मध्ये जिंकला होता.
(हेही वाचा – High Court : कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी होणार बंद ; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा)
आगा पुढे म्हणाले, ‘पाकिस्तान-भारत (Pakistan-India) सामना हा सर्वात मोठा आहे, पण चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy) जिंकणे हे त्याहूनही महत्त्वाचे आहे. जर आपण भारताला हरवले पण स्पर्धा जिंकली नाही, तर त्या विजयाचे काही महत्त्व राहणार नाही. तथापि, जर आपण भारताकडून हरलो पण करंडक जिंकली तर ती एक मोठी कामगिरी असेल. आमचे लक्ष्य चांगली कामगिरी करणे आणि ही मोठी स्पर्धा जिंकणे आहे.
पुढे तो म्हणाला की, ‘चॅम्पियन्स करंडकसाठी (Champions Trophy) मी उत्साहित आहे आणि पाकिस्तान आयसीसीच्या स्पर्धेचे आयोजन करत आहे हे विशेष आहे. लाहोरचा रहिवासी म्हणून, माझ्या गावी करंडक उचलणे हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे असेल. पाकिस्तान संघात स्पर्धा जिंकण्याची क्षमता आहे. असेही सलमानने (Salman Ali Agha) म्हटलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community