- ऋजुता लुकतुके
भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ चांगला जमून आला आहे. आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत उपविजेतेपदही पटकावलं. त्यानंतरची मोठी आयसीसी स्पर्धा आता होणारए ती जून २०२४ मध्ये. या स्पर्धेचं वेळापत्रकही शुक्रवारी जाहीर झालं आहे. आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या सामन्याची जाहिरातही सगळीकडे सुरू झाली आहे. (We Want Rohit Sharma)
९ जूनला न्यूयॉर्क इथं हा सामना होणार आहे. पण, या सामन्याची जाहिरात टीव्ही प्रसारक वाहिनीने सुरू केलीय, त्यावर मात्र लोक चिडले आहेत. (We Want Rohit Sharma)
कारण, या जाहिरातीतील फोटोत हार्दिक पांड्या आणि शाहीन आफ्रिदीचे फोटो आहेत आणि हेच चाहत्यांना रुचलेलं नाही. चाहत्यांना तिथं हार्दिक ऐवजी रोहित शर्मा (Rohit Sharma) हवा आहे. त्यामुळे अनेकांच्या प्रतिक्रिया ‘वी वाँट रोहित (Rohit Sharma) हिअर (आम्हाला इथं रोहीत हवा आहे!),’ अशाच आहेत. (We Want Rohit Sharma)
We want Rohit Sharma’s photo
— Sankott (@Iamsankot) January 5, 2024
Why Hardik Pandya in the poster ? How do you know that he will be the captain??
— Lalatendu Rout (@Littu85) January 5, 2024
How come you have shown pic of @hardik as Captain when officially @ImRo45 is still India’s T20 Captain.This is not correct,@BCCI.@HashTagCricket @AMP86793444 @CricCrazyJohns
— Narayan Mahadevan (@tmnarayan) January 5, 2024
(हेही वाचा – North West Constituency : उबाठा शिवसेनेच्या आणखी दोन संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत)
भारत पाक सामना ९ जूनला न्यूयॉर्कला
दरम्यान, टी-२० विश्वचषकाचं वेळापत्रक शुक्रवारी जाहीर झालं आहे. आणि स्पर्धेची सुरुवात १ जूनला अमेरिका विरुद्ध कॅनडा सामन्याने होणार आहे. तर भारत पाक सामना ९ जूनला न्यूयॉर्कला होणार आहे. भारताचा समावेश अ गटात झाला आहे. या गटात भारतासह अमेरिका, कॅनडा, पाकिस्तान आणि आयर्लंड हे देश आहेत. भारताचे साखळीतील सर्व सामने अमेरिकेत होणार आहेत. (We Want Rohit Sharma)
स्पर्धेत २० संघांची विभागणी चार गटांत करण्यात आली आहे. आणि गटवार साखळी सामन्यांनंतर प्रत्येक गटातून पहिले दोन संघ सुपर सिक्समध्ये जातील. आणि पुढे सुपर सिक्समधून चार संघ बाद फेरीत पोहोचतील. अंतिम सामना २० जूनला बार्बाडोसला होणार आहे. स्पर्धेत एकूण ५५ सामने होणार आहेत. (We Want Rohit Sharma)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community