भारताची अनुभवी आणि स्टार गोलंदाज झुलन गोस्वामी आज (24 सप्टेंबरला) इंग्लंडविरुद्ध तिच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळणार आहे. दोन दशके भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व करणा-या झुलन गोस्वामीने जागितक क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. इंग्लंड दौ-यातील एकदिवसीय मालिका तिच्या कारकिर्दीतील अखेरची मालिका असेल, असे तिने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. भारत इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखरेचा सामना शनिवारी खेळला जाणार आहे.
लाॅर्डस येथे खेळवल्या जाणा-या अखेरचा एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार, दुपारी 3: 30 वाजता खेळला जाईल. या सामन्यात झुलन गोस्वीमी अखेरचे संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. आता या सामन्याला काही वेळ शिल्लक असताना, झुलन गोस्वामीने एक व्हिडीओ शेअर करत, भारतीय संघाची जर्सी घालून राष्ट्रगीत म्हणणं हे माझ्या आयुष्यातील सुवर्ण क्षण आहेत, असे म्हटलं आहे.
( हेही वाचा: पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान PFI ने रचला होता हल्ला करण्याचा कट? ईडीचा दावा )
Join Our WhatsApp Community💬 💬 Singing India’s National Anthem and wearing the India jersey will always remain the best moments in my life: @JhulanG10 #TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/SHpjRyL1Hn
— BCCI Women (@BCCIWomen) September 24, 2022