-
ऋजुता लुकतुके
खेळाडूंचं आंदोलन आणि त्यानंतर कुस्ती फेडरेशनची झालेली निवडणूक आणि ही निवडणूक स्थगित करून क्रीडा मंत्रालयाने कुस्ती फेडरेशनचं केलेलं निलंबन अशा कितीतरी गोष्टी भारतीय कुस्तीने मागच्या दोन वर्षांत पाहिल्या आहेत. त्यानंतर आता क्रीडा मंत्रालयाने ही बंदी ताबडतोबीने हटवली आहे. त्यामुळे कुस्तीची सूत्र पुन्हा एकदा कुस्ती फेडरेशनचे निवडून आलेले अध्यक्ष संजय सिंग (Sanjay Singh) यांच्या हातात आली आहेत. संजय सिंग (Sanjay Singh) हे वादग्रस्त आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण (Brij Bhushan Sharan Singh) यांचे निकटवर्तीय आहेत. (WFI Ban Lifted)
येत्या २५ मार्चपासून जॉर्डनच्या अम्मान इथं आशियाई अजिंक्यपद स्पर्धा (Asian Championship) होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ पाठवायचा झाल्यास त्यासाठी देशात कुस्ती संघटना अस्तित्वात असणं गरजेचं होतं. त्यांच्याकडून मान्यता मिळालेला संघच जागतिक स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करू शकतो. आणि आशियाई स्पर्धेत (Asian Championship) खेळलं नाही तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीपटूंना पात्र होता येणार नव्हतं. त्यामुळे क्रीडा मंत्रालयाने तातडीने हा निर्णय घेतला आहे. (WFI Ban Lifted)
(हेही वाचा – Lilavati Hospital : लीलावती रुग्णालय ट्रस्ट मध्ये १२ हजार कोटींचा गैरव्यवहार, १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल)
जागतिक अजिंक्यपद स्पर्धा १३ ते २१ सप्टेंबर दरम्यान झाग्रेब इथं होणार आहेत. ‘भारतीय क्रीडा क्षेत्र आणि खेळाडूंचा हित, त्याचबरोबर क्रीडास्पर्धांचे काही निकष लक्षात घेऊन कुस्ती फेडरेशनवर नोव्हेंबर २०२३ मध्ये केलेली निलंबनाची कारवाई तातडीने मागे घेण्यात येत आहे,’ असं क्रीडा मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. डिसेंबर २०२३ ला कुस्ती फेडरेशनच्या निवडणुका झाल्या. त्यात संजय सिंग (Sanjay Singh) अध्यक्ष म्हणून निवडून आले. पण, आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी या निवडणूक प्रक्रियेविरोधातही आवाज उठवला होता. बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक या आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या खेळाडूंबरोबरच ९०० च्यावर मल्लांनी कुस्ती फेडरेशनच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. (WFI Ban Lifted)
त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने फेडरेशनचं निलंबन करून कुस्तीचा कारभार चालवण्यासाठी तीन जणांची तात्पुरती समिती बसवली होती. पण, आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभागासाठी कुस्ती फेडरेशनची स्थापना अनिवार्य आहे. २०२३ पासून देशातील जवळ जवळ १००० मल्ल राजधानी दिल्लीत माजी कुस्ती फेडरेशन अध्यक्ष ब्रिजभूषण शरण (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात आंदोलन करत होते. शरण यांच्याविरुद्ध ५ महिला कुस्तीपटूंचा विनयभंग आणि लैगिक गैरवर्तन केल्याचा आरोप खेळाडूंनी केला होता. शरण यांची अध्यक्ष म्हणून मुदत तोपर्यंत संपली होती. पण, नवीन निवडणुकीत त्यांनी आपले निकटवर्तीय संजय सिंग (Sanjay Singh) यांच्या बाजूने आपली ताकद लावली. आणि ते निवडूनही आले. खेळाडूंनी उभ्या केलेल्या पॅनलचा पराभव झाला. त्यानंतर आधीचीच कार्यकारिणी कुस्ती फेडरेशनच्या दैनंदिन कारभारात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप झाला. आणि त्याच कारणावरून क्रीडा मंत्रालयाने फेडरेशन बरखास्त केली. आता तिची पुनर्स्थापना झाल्यावर आंदोलनकर्ते खेळाडू काय भूमिका घेतात हे पाहवं लागेल. (WFI Ban Lifted)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community