- ऋजुता लुकतुके
कुस्ती फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंग (Sanjay Singh) यांनी तात्पुरत्या समितीचे सर्व निर्णय रद्द केले आहेत. यातलाच एक आहे ऑलिम्पिकसाठी निवडीचे बदललेले निकष. (WFI Election)
कुस्ती फेडरेशनची निवडणूक झाल्यानंतर नवीन अध्यक्ष संजय सिंग (Sanjay Singh) यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणीने आपला कारभार सुरू केला आहे आणि पहिल्याच दिवशी संजय सिंग (Sanjay Singh) यांनी तात्पुरत्या समितीने घेतलेले सर्व निर्णय रद्द केले आहेत. निवडणूक होईपर्यंत क्रीडा मंत्रालयाने भूपेंदर सिंग बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली तात्पुरती समिती गठित केली होती. (WFI Election)
या समितीने अलीकडेच पॅरिस ऑलिम्पिकसाठी खेळाडूंची निवड करण्याचे निकष बदलले होते. तसंच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा जयपूरमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. आता हे सर्व निर्णय नवीन अध्यक्षांनी रद्द केले आहेत. गुरुवारी फेडरेशनची निवडणूक पार पडल्या पडल्या ११ कार्यकारिणी सदस्य नवी दिल्लीत एका हॉटेलमध्ये भेटले आणि तिथे त्यांनी आपली पहिली सभा घेतली. (WFI Election)
(हेही वाचा – CM Eknath Shinde : मुंबईतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पांना गती देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा)
सरचिटणिर प्रेमचंद लोचब आणि उपाध्यक्ष देवेंदर सिंग काडियन हे दोन सदस्य या बैठकीला नव्हते. ते अनिता शेरॉन यांच्या पॅनलचे आहेत. या पॅनलला या दोनच जागा जिंकता आल्या आहेत. ‘भूपेंदर बाजवा यांच्या समितीने घेतलेले सगळेच निर्णय आम्ही रद्द केले आहेत,’ असं संजय सिंग (Sanjay Singh) यांच्या कार्यकारिणीतील एकाने पीटीआयला सांगितलं. (WFI Election)
बाजवा समितीने ऑलिम्पिक पात्रता जिंकलेल्या कुस्तीपटूसाठीही निवड चाचणी स्पर्धा अनिवार्य केली होती. हा निर्णयही आता रद्द झाला आहे. तर नवीन कार्यकारिणीची पहिली बैठक जानेवारी महिन्यात १४, १५ तारखेला होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. (WFI Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community