WFI Election Timeline : ब्रिजभूषण शरण आणि कुस्तीपटूंच्या वादात आतापर्यंत काय काय घडलं?

अखेर खेळाडूंनी जी भीती होती तेच झालंय. ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्तीय संजय सिंगच अध्यक्षपदी निवडून आले. 

200
WFI Election Timeline : ब्रिजभूषण शरण आणि कुस्तीपटूंच्या वादात आतापर्यंत काय काय घडलं?
WFI Election Timeline : ब्रिजभूषण शरण आणि कुस्तीपटूंच्या वादात आतापर्यंत काय काय घडलं?
  • ऋजुता लुकतुके

अखेर खेळाडूंनी जी भीती होती तेच झालंय. ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्तीय संजय सिंगच अध्यक्षपदी निवडून आले. (WFI Election Timeline)

यावर्षी जानेवारी महिन्यात राजधानी दिल्लीतील थंडीत जंतर मंतरवर एक वेगळंच आंदोलन उभं राहिलं. यात बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट या आंतरराष्ट्रीय ओळख असलेल्या कुस्तीपटूंबरोबरच राष्ट्रीय स्तरावरचे कुस्तीपटूही उपोषणाला बसले होते. आधीच निलंबित असलेल्या कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्यावर पोलीस कारवाई करा असं त्यांचं म्हणणं होतं. ब्रिजभूषण या खेळाडूंना कुस्तीच्या आसपासही नको होते आणि तिथून पुढे आंदोलनाला वेगवेगळी वळणं लागत गेली. मागणी मात्र कायम राहिली. नेमकं काय आणि कसं कसं घडलं ते पाहूया, (WFI Election Timeline)

१८ जानेवारी २०२३ – काही कुस्तीपटू जंतर मंतर बाहेर उपोषणाला बसले. त्यांनी कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाचे आरोप केले. कुस्ती फेडरेशन बरखास्त करा, शरण यांना हटवा अशी त्यांची मागणी होती. (WFI Election Timeline)
१९ जानेवारी २०२३ – राष्ट्रकूल पदक विजेती आणि सत्ताधारी भारतीय जनता पार्टीची सदस्य बबिता फोगाट यांनी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंची भेट घेतली. आपण सरकारसमोर खेळाडूंचं म्हणणं मांडू असं ती म्हणाली.
२० जानेवारी २०२३ – खेळाडूंनी आता भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी टी उषा यांना पत्र लिहिलं. शरण यांच्या विरोधातील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमावी. आणि कुस्ती फेडरेशनचा कारभार त्रयस्थ समितीकडे सोपवाला असं या पत्रात म्हटलं होतं. (WFI Election Timeline)

त्यानंतर ऑलिम्पिक असोसिएशनने सात जणांची समिती नेमली. या समितीत मेरी कोम आणि योगेश्वर दत्त हे खेळाडूही होते.

(हेही वाचा – Sarada Devi : रामकृष्ण परमहंस यांच्यासमवेत आध्यात्मिक संसार करणाऱ्या त्यांच्या पत्नी मां शारदा देवी)

२१ जानेवारी – आंदोलनकर्त्या खेळाडूंनी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर आपलं आंदोलन मागे घेतलं.

क्रीडा मंत्रालयाने एक आढावा समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि समितीचा निकाल येईपर्यंत ब्रिजभूषण शरण फेडरेशनच्या कामकाजापासून दूर राहतील, असा निर्वाळा दिला. (WFI Election Timeline)

तर भारतीय कुस्ती फेडरेशनने अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्यावरील आरोप फेटाळले.

२१ जानेवारी – क्रीडा मंत्रालयाने कुस्ती फेडरेशनला सध्या सुरू असलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देश दिले. आणि अतिरिक्त सचिव विनोद तोमर यांचं निलंबन केलं.
२३ जानेवारी – क्रीडा मंत्रालयाने वर म्हटल्याप्रमाणे आढावा समितीची स्थापना केली. पाच सदस्यीय या समितीचं अध्यक्षपद मेरी कोम यांच्याकडे होतं. या समितीला चौकशीसाठी ४ आठवड्यांची मुदत दिली गेली.
२४ जानेवारी – आंदोलनकर्त्या खेळाडूंनी समितीतील सदस्यांच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली. आणि समिती नेमताना आपलं मत विचारात घेतलं नाही, असा आरोपही केला. (WFI Election Timeline)
२३ फेब्रुवारी – या समितीला २ आठवडे मुदतवाढ दिली गेली.
१६ एप्रिल – भारतीय कुस्ती फेडरेशनने ७ मे ला निवडणुकीची घोषणा केली. चौकशी समितीचा अहवाल मंत्रालयाला सादर झाला होता. पण, तो उघड करण्यात आला नाही.

(हेही वाचा – Ind vs SA 3rd ODI : भारताच्या दुसऱ्या फळीचा दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याचा पराक्रम )

२३ एप्रिल – खेळाडू पुन्हा एकदा जंतर मंतरवर उपोषणाला बसले. एका अल्पवयीन मुलीसह एकूण सात कुस्तीपटूंनी कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात शरण यांच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत तक्रार केली असल्याचं कुस्तीपटूंनी मीडियाला सांगितलं. पण, दिल्ली पोलीस एफआयआरही दाखल करत नसल्याची तक्रारही केली.
२४ एप्रिल – क्रीडा मंत्रालयाने ७ मे च्या निवडणुका रद्द केल्या आणि ऑलिम्पिक असोसिएशनला एक तात्पुरती समिती नेमून कुस्ती फेडरेशनचा कारभार सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. या तात्पुरत्या समितीला ४५ दिवसांच्या आत निवडणुका घेण्यासंही सांगितलं. (WFI Election Timeline)
२५ एप्रिल – आंदोलनकर्त्या खेळाडूंनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. शरण यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची सक्ती दिल्ली पोलिसांना करावी अशी याचिका होती. न्यायालयाने दिल्ली पोलिसांकडे स्पष्टीकरण मागितलं.
२७ एप्रिल – ऑलिम्पिक असोसिएशनने ३ सदस्यीय समिती स्थापन केली. आणि आयओएच्या अध्यक्ष पी टी उषा यांनी खेळाडूंनी शिस्त बाळगायला हवी होती, असं मत व्यक्त केलं. आंदोलनापूर्वी असोसिएशनला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, असं त्यांचं म्हणणं होतं. (WFI Election Timeline)
३ मे – कुस्तीपटूंची आंदोलनादरम्यान पोलिसांशी हमरातुमरी झाली. पोलिसांनी महिला खेळाडूंना चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला. काही कुस्तीपटूंना डोक्यावर जखमाही झाल्या. तर काही खेळाडूंना पोलिसांनी ताब्यातही घेतलं.

पोलीस दारुच्या नशेत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या खेळाडूंनी केला.

(हेही वाचा – Accident : बार्शी-धाराशिव मार्गावर एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात ; तिघांचा जागीच मृत्यू)

४ मे – सर्वोच्च न्यायालयात खेळाडूंच्या याचिकेवर सुनावणी संपली. दिल्ली पोलिसांत तोपर्यंत एफआयआर दाखल झालेली होती. आणि तक्रारदार महिलांना सुरक्षाही मिळाली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याचिका निकालात काढली. (WFI Election Timeline)
५ मे – दिल्ली पोलिसांनी तक्रारदार महिलांपैकी ५ जणांचे जबाब नोंदवून घेतले. ब्रिजभूषण शरण यांच्या विरोधातील आरोप त्यांनी नोंदवून घेतले.
१० मे – खेळाडूंचं ब्रिजभूषण शरण यांना नार्को चाचणी करण्याचं आव्हान.
११ मे – पोलिसांनी ब्रिजबूषण शरण यांचाही जबाब नोंदवला.

(हेही वाचा – Ind vs SA 3rd ODI : भारताच्या दुसऱ्या फळीचा दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याचा पराक्रम )

२८ मे – नवीन संसदेच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या दिवशी खेळाडूंनी मोर्चा काढण्याचं ठरवलं. आणि असं करताना सरकारी कर्मचारी आणि पोलिसांशी गौरवर्तन आणि हुल्लडबाजी केल्याचा ठपका विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्यावर ठेवण्यात आला.
३० मे – आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषद आणि कुस्तीची जागतिक संघटना यांनी केंद्रसरकारचा निषेध केला. खेळाडूंशी सरकारचं वर्तन योग्य नसल्याचा आरोप. (WFI Election Timeline)

यानंतर खेळाडूंनी आपली पदकं गंगेत विसर्जन करण्याचा पवित्रा घेत हरिद्वार गाठलं.

७ जून – क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी मध्यस्थी केल्यानंतर खेळाडूंचं आंदोलन थांबलं. शरण यांच्या विरोधातील पोलीस कारवाई पूर्ण करण्याचं आश्वासन ठाकूर यांनी दिलं. तसंच कुस्ती फेडरेशनच्या निवडणुकीचीही हमी दिली.
१३ जून – कुस्ती फेडरेशनच्या निवडणुकीसाठी ६ जुलै हा दिवस मुक्रर. (WFI Election Timeline)

(हेही वाचा – ATS Raid : एटीएसच्या कारवाईत दोन बांगलादेशी नागरिक ताब्यात)

१५ जून – दिल्ली पोलिसांनी शरण यांच्या विरोधातील आरोपपत्र न्यायालयाला सादर केलं.
२१ जून – कुस्ती फेडरेशनची निवडणूक ११ जुलैपर्यंत पुढे ढकलली.
२२ जून – आंदोलकर्त्या कुस्तीपटूंना संधी मिळावी यासाठी फेडरेशनने आशियाई क्रीडास्पर्धेसाठीच्या निवडीचे निकष बदलले. पण, याविरोधात इतर खेळाडू नाराज.
२५ जून – ११ जुलैच्या निवडणुकीला गुवाहाटी न्यायालयाची स्थगिती. (WFI Election Timeline)

(हेही वाचा – Weather Update : राज्यात थंडीचा पारा घसरला; रब्बी पिकांना पोषक वातावरण)

१८ जुलै – दिल्ली उच्च न्यायालयाचा ब्रिजभूषण शरण यांना अटकपूर्व जामीन.

बजरंग, विनेश यांना आशियाई क्रीडास्पर्धेत थेट प्रवेश.

२० जुलै – बजरंग आणि विनेशला थेट प्रवेश दिल्याबद्दल इतर कोच, खेळाडू, पालक यांच्यात नाराजी. हिस्सारमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन. (WFI Election Timeline)

कुस्ती फेडरेशनची निवडणूक १२ ऑगस्टला घेण्याचा निर्णय.

११ ऑगस्ट – यावेळी पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाची निवडणुकीला स्थगिती.

(हेही वाचा – Sanjay Raut : संजय राऊतांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना त्यांची ‘जागा’ दाखवली )

२३ ऑगस्ट – कुस्तीच्या आंतरराष्ट्रीय संघटनेची भारतीय फेडरेशनवर निलंबनाची कारवाई, वेळत निवडणुका न घेतल्याचा ठपका.
५ डिसेंबर – निवडणुकांची नवीन तारीख २१ डिसेंबर जाहीर. (WFI Election Timeline)
२१ डिसेंबर – ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्ती संजय सिंग यांची अध्यक्षपदी निवड.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.