WFI New Home : कुस्ती फेडरेशनचं कार्यालय ब्रिजभूषण शरण यांच्या घरातून हलवलं

मागची काही वर्षं भारतीय कुस्ती फेडरेशनचा कारभार वादग्रस्त माजी अध्यक्ष ब्रिज भूषण शरण यांच्या घरातूनच सुरू होता.

239
WFI New Home : कुस्ती फेडरेशनचं कार्यालय ब्रिजभूषण शरण यांच्या घरातून हलवलं
WFI New Home : कुस्ती फेडरेशनचं कार्यालय ब्रिजभूषण शरण यांच्या घरातून हलवलं
  • ऋजुता लुकतुके

मागची काही वर्षं भारतीय कुस्ती फेडरेशनचा कारभार वादग्रस्त माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण (Brijbhushan Sharan) यांच्या घरातूनच सुरू होता. (WFI New Home)

भारतीय कुस्ती फेडरेशनचं कार्यालय वादग्रस्त माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण (Brijbhushan Sharan) यांच्या घरातून अखेर हलवण्यात आलं आहे. गेल्याच आठवड्यात फेडरेशनच्या झालेल्या निवडणुका चांगल्याच वादग्रस्त ठरल्या. नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंग यांनी तातडीने घेतलेले काही निर्णय लोकशाही प्रक्रिया पार न पाडता घेतल्याचा ठपका ठेवून क्रीडा मंत्रालयाने तीन दिवसांतच नवीन कार्यकारिणी बरखास्त केली होती. आणि त्याचवेळी फेडरेशनचं कार्यालय अजूनही ब्रिजभूषण शरण (Brijbhushan Sharan) यांच्याच कार्यालयात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. (WFI New Home)

(हेही वाचा – Hafiz Saeed : भारताने पाककडे मागितला हाफिज सईदच ताबा; पाकिस्तानने का दिला नकार? )

आताचं नवीन कार्यालय हरिनगर भागात असल्याचं कुस्ती फेडरेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका सरकारी नोकराने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. ‘ब्रिजभूषण शरण (Brijbhushan Sharan) यांचं घर आम्ही सोडलं आहे. आणि आता नवीन कार्यालयातून काम करणार आहोत,’ असं या अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितलं. (WFI New Home)

काही माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंनी माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण (Brijbhushan Sharan) यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यामुळे देशातील कुस्तीचं वातावरण एका वर्षापासून गढूळलं आहे. त्यातच खेळाडूंनी लैंगिक अत्याचार शरण (Brijbhushan Sharan) यांच्या कार्यालयातच झाल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. (WFI New Home)

(हेही वाचा – Ram Mandir: प्रवाशांचे स्वागत करून दिल्या ‘जय श्री राम’ घोषणा, पायलटने व्यक्त केले पहिल्या उड्डाणाविषयीचे मनोगत…वाचा सविस्तर)

…म्हणूनच संजय यांच्या नियुक्तीला विरोध

त्यामुळेच रविवारी क्रीडा मंत्रालयाने कार्यकारिणी बरखास्तीची कारवाई केली तेव्हाच कार्यालय न बदलणं हे ही कारण दिलं होतं. (WFI New Home)

‘कुस्ती फेडरेशनचं कार्यालय अजूनही ब्रिजभूषण शरण यांच्याच घरी आहे. याच कार्यालयात शरण हे कुस्तीपटूंची भेट घेऊन त्यांना त्रास देत होते, अशी तक्रार असतानाही कार्यालय बदललं गेलं नाही, ही गंभीर बाब आहे. बाकी प्रकरण कोर्टात सुरू आहे. पण, कार्यालय तिथून ताबडतोब हलवणं गरजेचं आहे,’ असं क्रीडा मंत्रालयाने कारवाई करताना प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. (WFI New Home)

शिवाय नवीन कार्यकारिणी जुन्या कार्यकारिणी सदस्यांच्या अधिपत्याखाली काम करत आहे. आणि राष्ट्रीय क्रीडा धोरणाशी हे वागणं सुसंगत नाही, असं स्पष्ट निरीक्षणही या पत्रकात नोंदवलं आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंग हे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण (Brijbhushan Sharan) यांचे निकटवर्तीय मानले जातात. आणि ते शरण यांच्या मतानुसारच कार्यकारिणीचा कारभार पाहतील अशीच भीती व्यक्त केली जात होती. खेळाडूंचाही म्हणूनच संजय यांच्या नियुक्तीला विरोध होता. (WFI New Home)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.