WFI Row : क्रीडा मंत्रालयाकडून संजय सिंग यांच्यावर कायदेशीर कारवाईची तयारी 

क्रीडा मंत्रालयाने आधीच निलंबित केलेल्या कुस्ती फेडरेशनला सज्जड इशारा दिला आहे. 

221
WFI Row : क्रीडा मंत्रालयाकडून संजय सिंग यांच्यावर कायदेशीर कारवाईची तयारी 
WFI Row : क्रीडा मंत्रालयाकडून संजय सिंग यांच्यावर कायदेशीर कारवाईची तयारी 
  • ऋजुता लुकतुके

भारतीय कुस्ती फेडरेशनची नवनियुक्त कार्यकारिणी बरखास्त करण्याचा क्रीडा मंत्रालयाचा निर्णय कायम असून फेडरेशनने स्वत:च्याच घटनेचं पालन न केल्यामुळे ही कारवाई केल्याचं बुधवारी क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर निलंबित फेडरेशनचे अध्यक्ष संजय सिंग (Sanjay Singh) यांचा फेडरेशन स्वायत्त असल्याचा दावाही बिनबुडाचा असल्याचं क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. (WFI Row)

इतकंच नाही तर कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष संजय सिंग (Sanjay Singh) यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारीही क्रीडा मंत्रालयाने सुरू केली आहे. संजय सिंग (Sanjay Singh) यांनी अलीकडेच २९ ते ३१ जानेवारी दरम्यान पुण्यात कुस्तीची राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली होती. आणि या स्पर्धेत ७०० मल्लांनी भाग घेतल्याचं संजय सिंग (Sanjay Singh) यांनी अलीकडेच मीडियाशी बोलताना म्हटलं होतं. त्यामुळेच क्रीडा मंत्रालयाने बुधवारी पुन्हा एकदा संजय सिंग (Sanjay Singh) यांना पत्र लिहून ही ताकीद दिली आहे. (WFI Row)

‘कुस्ती फेडरेशनच्या कार्यकारिणीला क्रीडा मंत्रालयाकडून मान्यता मिळण्याबाबत तुम्ही काही दावे करत आहात. तसंच पुण्यातील राष्ट्रीय स्पर्धेविषयीही तुम्ही मीडियाला प्रतिक्रिया देत आहात. पण, आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, कुस्ती फेडरेशनच्या मान्यतेविषयी तुम्ही केलेले दावे बिनबुडाचे आणि खोटे आहेत. तसंच तुम्ही भरवत असलेली स्पर्धा हा मान्यताप्राप्त नसेल,’ असं क्रीडा मंत्रालयाने संजय सिंग न यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. (WFI Row)

(हेही वाचा – आपल्या दैनंदिन आध्यात्मिक दिनचर्येत श्रीराम स्तुतीचा (Shri Ram Stuti) समावेश का करावा?)

संजय सिंग यांना राज्य कुस्ती संघटनांचा पाठिंबा

क्रीडा मंत्रालयाने २४ डिसेंबरला कुस्ती फेडरेशनवर निलंबनाची कारवाई केली. २१ डिसेंबरला फेडरेशनची निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेल्या नवीन कार्यकारिणीने दुसऱ्याच दिवशी कार्यकारिणीची बैठक घेऊन, २ सदस्य गैरहजर असतानाही या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेऊन टाकले. त्यामुळे तातडीने क्रीडा मंत्रालयाने निलंबनाची कारवाई केली होती. (WFI Row)

गेल्यावर्षी जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंचा संजय सिंग (Sanjay Singh) यांना विरोध होताच. भारतीय कुस्तीत आता २ तट पडले आहेत. खेळाडूंच्या गटाचा पाठिंबा माजी कुस्तीपटू अनिता हुडा यांना आहे. तर माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांचा पाठिंबा असलेल्या संजय सिंग (Sanjay Singh) यांना राज्य कुस्ती संघटनांचा पाठिंबा आहे. (WFI Row)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.