WFI Row : जागतिक कुस्ती फेडरेशनने भारतीय संघटनेवरील बंदी तातडीने हटवली

भारतीय कुस्ती फेडरेशनला क्रीडा मंत्रालयाने मात्र निलंबित केलंय.

187
WFI Row : जागतिक कुस्ती फेडरेशनने भारतीय संघटनेवरील बंदी तातडीने हटवली
WFI Row : जागतिक कुस्ती फेडरेशनने भारतीय संघटनेवरील बंदी तातडीने हटवली
  • ऋजुता लुकतुके

भारतीय कुस्तीत (Indian wrestling) एका महत्त्वाच्या घडामोडीत जागतिक संघटनेनं भारतीय कुस्ती फेडरेशनवरील बंदी तातडीने हटवली आहे. पण, त्याचवेळी आंदोलन करणाऱ्या बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांना सापत्न वागणूक देणार नाही, याची हमीही आंतरराष्ट्रीय संघटनेनं मागितली आहे. (WFI Row)

भारतीय कुस्ती फेडरेशनचे (Indian Wrestling Federation) नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंग यांनी हा आपला विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आणि आता ठरल्याप्रमाणे राष्ट्रीय स्पर्धा घेणार असल्याचंही जाहीर केलं आहे. तर स्पोर्ट्स मंत्रालयाने यावर अजून कुठलीही प्रतिक्रिया किंवा भूमिका मांडलेली नाही. (WFI Row)

जागतिक संघटनेनं गेल्यावर्षी २३ ऑगस्टला भारतीय कुस्ती फेडरेशनवर (Indian Wrestling Federation) निलंबनाची कारवाई केली होती. तेव्हा कारण होतं संघटनेच्या कार्यकारिणीची निवडणूक वेळेवर न घेणं. त्यानंतर डिसेंबर महिन्यात ही निवडणूक झाली. आणि आंदोलनकर्त्या खेळाडूंचा विरोध असलेले ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्ती संजय सिंग निवडणुकीत निवडून आले. शरण यांच्या जवळचे असल्यामुळे बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांच्यासह आणखी काही खेळाडूंनी या निवडीला विरोध केला. आणि खेलरत्न, अर्जुन यासारखे राष्ट्रीय पुरस्कार परत देण्याची भूमिकाही त्यांनी घेतली. (WFI Row)

तर निवडून आलेले संजय सिंग यांनी निकालाच्याच दिवशी संध्याकाळी एकतर्फी बैठक बोलावून आधी कुस्तीचा कारभार पाहण्यासाठी नेमलेल्या तात्पुरत्या समितीचे सर्व निर्णय रद्द केले. या प्रकारामुळे क्रीडा मंत्रालयाने (Ministry of Sports) निवडणुकीनंतर तीनच दिवसांत नवनियुक्त कार्यकारिणी बरखास्त केली. आणि पुन्हा तात्पुरती समिती बसवली. कार्यकारिणी लोकशाही पद्धतीने कारभार करत नसल्याचा ठपका मंत्रालयाने ठेवला. (WFI Row)

(हेही वाचा – Rajya Sabha Elections : भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुळकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी)

क्रीडा मंत्रालयाकडून अजून कुठलंही स्पष्टीकरण नाही

पण, कार्यकारिणीचे अध्यक्ष संजय सिंग यांनी राज्य संघटनांच्या पाठिंब्यावर आपला कारभार सुरूच ठेवला आहे. आणि आपणच खरी संघटना असल्याचा दावा केला आहे. त्यांना राज्य संघटनांचा पाठिंबा आहे. तर क्रीडा मंत्रालयाने (Ministry of Sports) बसवलेल्या तात्पुरत्या समितीला ऑलिम्पिक असोसिएशन आणि साई अशा सरकारी यंत्रणांचा पाठिंबा आहे. (WFI Row)

भारतीय कुस्तीत त्यामुळे गोंधळाची परिस्थिती कायम आहे. ‘जागतिक कुस्ती फेडरेशनच्या कार्यकारिणीची बैठक ९ फेब्रुवारीला झाली. यात उपलब्ध माहितीचा आढावा घेत भारतीय कुस्ती फेडरेशनवरील (Wrestling Federation) बंदी हटवण्यावर निर्णय झाला,’ असं आंतरराष्ट्रीय संघटनेनं काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. (WFI Row)

जागतिक संघटनेनं भारतीय कुस्तीपटूंच्या संपर्कात राहून त्यांच्याकडूनही परिस्थितीचा आढावा घ्यायचं ठरवलं आहे. संजय सिंग यांनी हा आपला विजय असल्याचीच प्रतिक्रिया दिलीय. पण, क्रीडा मंत्रालयाकडून (Ministry of Sports) अजून कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही. तर खेळाडूंमध्ये गोंधळ कायम आहे. खुद्द विनेश फोगाटने अलीकडे तात्पुरत्या समितीने भरवलेली राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला. आणि तिने ५५ किलो गटात सुवर्णही मिळवलं. (WFI Row)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.