WFI Row : कुस्ती फेडरेशनच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांना क्रीडा मंत्रालयाची मान्यता नाहीच

भारतीय कुस्तीतील अंतर्गत वातावरण अजूनही गढूळलेलंच आहे. आणि नवनियुक्त कुस्ती फेडरेशन आणि क्रीडा मंत्रालयाचा वाद सुरूच आहे. 

258
WFI Row : कुस्ती फेडरेशनच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांना क्रीडा मंत्रालयाची मान्यता नाहीच
WFI Row : कुस्ती फेडरेशनच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांना क्रीडा मंत्रालयाची मान्यता नाहीच
  • ऋजुता लुकतुके

भारतीय कुस्तीतील अंतर्गत वातावरण अजूनही गढूळलेलंच आहे. आणि नवनियुक्त कुस्ती फेडरेशन (Wrestling Federation) आणि क्रीडा मंत्रालयाचा वाद सुरूच आहे. (WFI Row)

नवनियुक्त कुस्ती फेडरेशनने क्रीडा मंत्रालयाची निलंबनाची कारवाई झुगारून दिली आणि न्यायालयीन लढाई लढण्याची भाषा केली. त्यानंतर आता क्रीडा मंत्रालयाकडूनही फेडरेशनने आयोजित केलेल्या स्पर्धा आणि कार्यक्रम यांना मान्यता देणार नाही, असं बजावलं आहे. त्यामुळे आधीच वर्षभर देशातील कुस्तीचा कार्यक्रम बिघडलेलाच होता. आता फेडरेशनच्या निवडणुका झाल्या तरी चक्र रुळावर येण्याचं नाव घेत नाही. (WFI Row)

‘कुस्ती फेडरेशनकडे (Wrestling Federation) राष्ट्रीय स्पर्धा भरवण्याचा अधिकार नाही,’ या शब्दांत क्रीडा मंत्रालयाने फेडरेशनला सुनावलं आहे. (WFI Row)

(हेही वाचा – Lok Sabha Elections : भाजपच्या दोन ‘पॉवरफुल्ल’ आमदारांना लोकसभेचे तिकीट नको)

हा सगळा गोंधळ खरंतर गेल्यावर्षी कुस्तीपटूंनी माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्या विरुद्ध केलेल्या आंदोलनानंतर सुरू झाला. पण, त्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये कुस्ती फेडरेशनच्या नव्याने निवडणुका झाल्या. आणि संजय सिंग अध्यक्ष म्हणून निवडूनही आले. पण, संजय सिंग लैंगिक छळाचे आरोप असलेले माजी अध्यक्ष शरण यांचे निकटवर्तीय आहेत, असा आरोप करत आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी त्यांच्या निवडीला विरोध केला. बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी तर खेलरत्न पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारही परत करण्याचा पवित्रा घेतला. तर ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षीने खेळ सोडल्याची घोषणा केली. (WFI Row)

तरीही संजय सिंग बधले नव्हते. आणि त्यांनी नवनियुक्त कार्यकारिणीची तातडीने एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. आणि काही निर्णय जाहीर करून टाकले. कुस्ती फेडरेशनची (Wrestling Federation) ही निर्णय प्रक्रिया अयोग्य आणि क्रीडा धोरणाशी विसंगत आहे, असं सांगत क्रीडा मंत्रालयाने निवडणुकीनंतर ३ दिवसांत कुस्ती फेडरेशन निलंबित करून टाकली. आणि ऑलिम्पिक असोसिएशन करवी कुस्तीच्या कारभारासाठी तात्पुरती समिती बसवली. (WFI Row)

(हेही वाचा – Talathi Recruitment Exam : तलाठी भरती परीक्षेतील गुणांचा गोंधळ नेमका काय ? महसूल विभागाचे स्पष्टीकरण)

फेडरेशनचे अध्यक्ष संजय सिंग (Sanjay Singh) यांनी निवडणूक प्रक्रियेनंतर आपली निवड झाल्यामुळे आणि फेडरेशन स्वायत्त संस्था असल्याचं सांगत क्रीडा मंत्रालयाचा निर्णय धुडकावून लावला आहे. आणि त्याविरोधात कोर्टात जाण्याची भाषा केली आहे. तर कुस्तीच्या राष्ट्रीय स्पर्धा आपणच घेणार असाही पवित्रा घेतला आहे. (WFI Row)

थोडक्यात, भारतीय कुस्तीमध्ये सध्या क्रीडा मंत्रालय, साई आणि ऑलिम्पिक असोसिएशनचा पाठिंबा असलेली तात्पुरती समिती आणि दुसरीकडे राज्य कुस्ती संघटनांचा पाठिंबा असलेली कुस्ती फेडरेशन (क्रीडा मंत्रालयाने निलंबित केलेली) असा कलगीतुरा रंगला आहे. आणि नुकसान खेळाडूंचं होतंय. (WFI Row)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.