WFI Suspension : कुस्ती फेडरेशनच्या निलंबनाविरोधात संजय सिंग कोर्टात दाद मागणार 

गेल्या आठवड्यात झालेल्या निवडणुकीत संजय सिंग कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. आणि फेडरेशनच्या बरखास्तीचा सरकारचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे 

183
WFI Suspension : कुस्ती फेडरेशनच्या निलंबनाविरोधात संजय सिंग कोर्टात दाद मागणार 
WFI Suspension : कुस्ती फेडरेशनच्या निलंबनाविरोधात संजय सिंग कोर्टात दाद मागणार 

ऋजुता लुकतुके

कुस्ती फेडरेशनची (WFI Suspension) गेल्या आठवड्यातील निवडणूक वादग्रस्त ठरल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी नवीन निवडून आलेली कार्यकारिणीच बरखास्त केली होती. दैनंदिन कारभारासाठी २ सदस्यीय नवीन तात्पुरती समितीही नेमली. पण, क्रीडा मंत्रालयाची ही कारवाई अयोग्य असल्याचं फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंग यांनी म्हटलं आहे. सरकारने बरखास्तीचा निर्णय घेताना योग्य ती प्रक्रिया राबवली नाही, त्यामुळे हे निलंबनच अवैध आहे, असा सिंग यांचा दावा आहे. आता तो सरकारच्या निर्णयाविरोधात कोर्टात दाद मागणार आहेत.

‘लोकशाही पद्धतीने झालेली निवडणूक आम्ही जिंकली आहे. निवडणुकीचे नियंत्रक जम्मू व काश्मीर हायकोर्टाचे माजी न्यायाधीश होते. जागतिक कुस्ती फेडरेशनचे सदस्य निवडणुकीच्या वेळी तिथे हजर होते. २२ राज्यांच्या संघटना तिथे होत्या. इतक्या पारदर्शी पद्धतीने निवडणुका होऊन, जर कुणी फेडरेशन बरखास्त करणार असेल, तर आम्हाला हा निर्णय मान्य नाही. आम्ही कोर्टात दाद मागू,’ असं संजय सिंग पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.

(हेही वाचा-Virat Kohli : विराट कोहलीच्या नावावर ‘हा’ नवीन विक्रम )

भारतीय कुस्ती फेडरेशन (WFI Suspension) ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे क्रीडा मंत्रालयानेच नियम पाळलेले नाहीत, असा सिंग यांचा दावा आहे. शिवाय सरकारचा निर्णयच मान्य नसल्यामुळे तीन सदस्यीय तात्पुरती समितीही आपल्याला मान्य नसल्याचंही संजय सिंग यांनी सांगितलं.

संजय सिंग यांच्या नियुक्तीला बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा विरोध होता. तिघांनीही सिंग यांच्या नियुक्तीनंतर आपली पद्मश्री, खेलरत्न सारखे पुरस्कार परत केले. तर साक्षीने खेळ सोडण्याची घोषणा केली.

याविषयी बोलताना सिंग म्हणतात, ‘बजरंग, साक्षी आणि विनेश राजकारण करत आहेत. हरयाणातील आखाड्यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी येऊन गेले. तिथे ते बजरंग पुनियाबरोबर बोलले. यातूनच हे स्पष्ट होतंय की, राजकारण सुरू आहे.’

संजय सिंग यांनी जागतिक कुस्ती संघटनेकडेही दाद मागितल्याचं म्हटलं आहे. आणि ही संघटना आपल्याला न्याय मिळून देईल अशी अपेक्षाही व्यक्त केली.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.