…म्हणून कोहलीने कर्णधारपद सोडले! काय म्हणाले BCCI अध्यक्ष सौरव गांगुली

91

बीसीसीआयने कोहलीवर आयसीसीचे एकही जेतेपद जिंकले नाही असा ठपका ठेवत त्याला कर्णधार पदावरून दूर केले होते. एकदिवसीय कर्णधारपदावरून विराट कोहलीला हटवण्यात आल्यानंतर, आता विराटने कसोटीचे कर्णधारपदही सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यावर माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली याने प्रतिक्रिया दिली आहे.

हा निर्णय वैयक्तिक

टीम इंडियाचे कसोटी कर्णधारपद सोडण्याचा विराट कोहलीचा हा निर्णय वैयक्तिक आहे. असे माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ट्विट करत स्पष्ट केले आहे. सौरव गांगुलीने ट्विट केले की, ”विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटने खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये झपाट्याने प्रगती केली आहे. त्याचा निर्णय वैयक्तिक आहे आणि बीसीसीआय त्याचा खूप आदर करते. या संघाला नव्या उंचीवर नेण्यासाठी तो टीमचा एक महत्त्वाचा सदस्य असेल. असेही सांगत गांगुलीने विराट कोहलीला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

तत्पूर्वी, विराट कोहलीने विश्वचषकानंतर टी-२० ची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले होते. विराट कोहलीने २०१४ मध्ये कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा भारत कसोटी फॉरमॅटमध्ये सातव्या क्रमांकावर होता यानंतर विराटच्या नेतृत्वाखाली भारताने पहिले स्थान मिळवले.

( हेही वाचा : देशात कोरोना लसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती; आतापर्यंत 157 कोटी नागरीकांनी घेतली लस )

जिंकण्याची तीव्र इच्छा

विराट कोहलीने २०११ मध्ये भारतीय टीममध्ये पदार्पण केल्यापासून भारतासाठी ९९ कसोटी सामने खेळले असून, ७ हजार ९६२ धावा केल्या आहेत. दरम्यान, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही विराट कोहलीसाठी ट्विट केले आहे. सध्या हा निर्णय वादाच्या केंद्रस्थानी आहे आणि या निर्णयामुळे क्रिकेट विश्वातून विविध प्रतिक्रिया येऊ शकतात. पण माझ्यासाठी विराटमध्ये अथक स्पर्धात्मकता आणि जिंकण्याची तीव्र इच्छा असते. जी आम्हाला आमच्या सर्व खेळाडूंमध्ये पहायची आहे. असे ट्विट करत महिंद्रा यांनी भविष्यासाठी विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.