Rohit Sharma on Record Sixes: ख्रिस गेलचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडल्यावर रोहीत गेलला काय म्हणाला?

भारतीय कर्णधार रोहीत शर्माने अफगाणिस्तान विरुद्ध खेळताना ख्रिस गेलचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत काढला. रोहीतच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५५६ षटकार लागले आहेत.

182
Rohit Sharma on Record Sixes: ख्रिस गेलचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडल्यावर रोहीत गेलला काय म्हणाला?
Rohit Sharma on Record Sixes: ख्रिस गेलचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडल्यावर रोहीत गेलला काय म्हणाला?

विश्वचषकातील अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहीत शर्माने ८१ चेंडूत १३१ धावांची सहजसुंदर खेळी साकार केली. यात त्याने ६ षटकारही लगावले. आणि तसं करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक दीर्घ काळ टिकलेला विक्रम मोडला. वेस्ट इंडिजचा धुवाधार फलंदाज ख्रिस गेलने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५५१ षटकार ठोकले होते. रोहीत आता त्याच्यापेक्षा ५ षटकार वर आहे. शिवाय रोहीतने ४५३ सामन्यात ही किमया केली आहे. म्हणजेच गेलपेक्षा रोहीतला ३० सामने कमी लागले. (Rohit Sharma on Record Sixes)

या कामगिरीनंतर बीसीसीआयने एक व्हीडिओ जारी केला आहे. यात रोहीत आधीचा विक्रमवीर ख्रिस गेल विषयी आपल्या भावना व्यक्त करतोय. ‘सृष्टीचा बॉस हा सृष्टीचा बॉसच असतो. वर्षानुवर्षे त्याला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मैदानांवर, वेगवेगळ्या वातावरणात षटकारांवर षटकार मारताना पाहिलं आहे. तो षटकारांचं मशिनच होता. त्याच्या मोठ्या कारकीर्दीतील मी एक छोटंसं पान आहे. शिवाय आम्ही दोघंही ४५ क्रमांकाची जर्सी घालतो. त्यामुळे गेलचा विक्रम मी मोडला याचं त्याला वाईट वाटणार नाही. एका ४५ जर्सीने दुसऱ्या ४५ जर्सीचा विक्रम मोडलाय,’ असं रोहीत शर्मा म्हणाला आहे.

रोहीतचा विक्रम झाल्या झाल्या काल ख्रिस गेलनेही आपल्या ट्विटर हँडलवर लगेचच रोहीतचं अभिनंदन करणारा संदेश लिहिला होता. ‘सर्वाधिक षटकारांच्या विक्रमासाठी रोहीतचं अभिनंदन. ही जर्सी क्रमांक ४५ ची किमया आहे,’ असं गेलने गंमतीने म्हटलं होतं. गेलने तो स्वत: रोहीत शर्मा यांचा पाठमोरा फोटो टाकला आहे. आणि यात दोघांचा जर्सी क्रमांक फकत दिसत आहे. रोहीतने कालच्या सामन्यात षटकारांबरोबर भारतासाठी विश्वचषकातील सर्वात जलद शतकाचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. त्यांचं एकदिवसीय क्रिकेटमधील हे ३१वं शतक होतं. आता सचिन ४९ आणि विराट ४७ हे दोनच भारतीय खेळाडू त्याच्या पुढे आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.