- ऋजुता लुकतुके
महेंद्रसिंग धोणीच्या खालोखाल रोहीत शर्मा आयपीएलमधील सगळ्यात यशस्वी कर्णधार होता
आयपीएलमध्ये नवीन हंगामासाठीच्या लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्स संघाने शनिवारी एक अनपेक्षित घोषणा केली. संघाचा कर्णधार म्हणून त्यांनी रोहीत शर्माच्या जागी हार्दिक पांड्याची नेमणूक केली. अर्थात, रोहीत शर्मा या पदासाठी योग्य नाही म्हणून नाही तर ३६ वर्षांच्या रोहीतच्या मार्गदर्शनाखाली नवीन कर्णधार तयार व्हावा म्हणून.
(हेही वाचा – Hardik Pandya: मुंबई इंडियन्सने केवळ एका तासात गमावले ४ लाख फॉलोअर्स, काय आहे कारण? वाचा सविस्तर…)
संघाची हीच भावना मग मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीला खेळाडू आणि संघाच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवायची होती. त्यासाठी त्यांनी मार्ग निवडला तो सोशल मीडियाचा. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्यांनी एक व्हीडिओ शेअर केला आहे. आणि यात रोहीत शर्माचा उल्लेख ‘कायमस्वरुपी कर्णधार’ असा केला आहे. शिवाय रोहीतचं नाव मुंबई इंडियन्सच्या इतिहासात निळ्या आणि सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलं आहे, असंही त्यात म्हटलं आहे.
Ro,
In 2013 you took over as captain of MI. You asked us to 𝐁𝐞𝐥𝐢𝐞𝐯𝐞. In victories & defeats, you asked us to 𝘚𝘮𝘪𝘭𝘦. 10 years & 6 trophies later, here we are. Our 𝐟𝐨𝐫𝐞𝐯𝐞𝐫 𝐜𝐚𝐩𝐭𝐚𝐢𝐧, your legacy will be etched in Blue & Gold. Thank you, 𝐂𝐚𝐩𝐭𝐚𝐢𝐧 𝐑𝐎💙 pic.twitter.com/KDIPCkIVop— Mumbai Indians (@mipaltan) December 15, 2023
रोहीत शर्मा २०१३ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार झाला. आणि त्यानंतर २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० अशी पाच विजेतेपदं संघाने मिळवली आहेत. पुढे जाऊन रोहीतने भारतीय राष्ट्रीय संघाचंही यशस्वी नेतृत्व केलं. रोहीतचा उल्लेख या व्हीडिओत त्याचं संघातील टोपणनाव ‘रो’ असा करण्यात आलाय.
(हेही वाचा – Sugar cane Juice : ‘इतक्या टनापर्यंत ‘ इथेनॉल निर्मितीस केंद्राची परवानगी; शेतकऱ्यांना दिलासा)
‘रो! २०१३मध्ये तू कप्तान झाल्यावर तू आम्हाला सांगितलंस, विश्वास ठेवा! आणि मग तू म्हटल्याप्रमाणे आम्ही विजय आणि पराजयातही एकमेकांवर विश्वास ठेवला. तू म्हणालास हसा! आपण दोन्ही परिस्थितीत हसत राहिलो. १० वर्षं आणि ६ करंडक जिंकल्यानंतर आता आपण काही बदल करतोय. पण, तू आपला कायमस्वरुपी कर्णधार राहशील. आणि तुझं योगदान निळ्या आणि सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल,’ असं या व्हीडिओत म्हटलं आहे.
हा निर्णय जाहीर करताना मुंबई इंडियन्सनी संघाची पुढील दिशा लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. एका महिन्यापूर्वी मुंबईने हार्दिक पांड्याला गुजरातकडून भरपूर मोबदला देऊन विकत घेतलं, तेव्हापासूनच हार्दिकला कर्णधार करणार असल्याची चर्चा होती.
(हेही वाचा – Lokayukta Bill : लोकायुक्त विधेयक विधानपरिषदेत एकमताने मंजूर)
मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू मार्टिन गपटिलने संघाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ‘रोहीत आणि मी आता ३५ कडे झुकलो आहोत. तर हार्दिक ३० वर्षांचा आहे. आणि त्याच्याकडे नेतृत्वाची क्षमता आहे. तेव्हा हे कधीतरी होणारच होतं. कर्णधार बदलाची ही योग्य वेळ आहे,’ असं गपटिलने लिंजंड्स लीगच्या पार्श्वभूमीवर म्हटलं आहे.
मुंबई इंडियन्सने पुढची दिशा बघून रोहीतच्या जागी नवीन नेमणूक केली. आता भारतीय संघात असे बदल कधी होतील, अशी चर्चाही क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे
हेही पहा –
Join Our WhatsApp Community