-
ऋजुता लुकतुके
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (MI Vs KKR) सामना सुरू होण्यापूर्वी जेव्हा खेळपट्टीची पाहणी सुरू होती, तेव्हा माजी इंग्लिश कर्णधार इयॉन मॉर्गनने (Eoin Morgan) खेळपट्टीचं वर्णन, ‘फलंदाजांचं नंदनवन,’ असं केलं होतं. कोलकाताचे सलामीवीर सुनील नरेन (Sunil Narine) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) मैदानात उतरले तेव्हाही त्यांच्याकडून फटेबाजीचीच अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी जोरदार प्रदर्शन करत १६.२ षटकांत कोलकाताचा डाव ११६ धावांत संपवला. यात सगळ्यात प्रभावी ठरला तो अश्वनी कुमार. त्याने आयपीएल (IPL) पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) बाद केलं. आणि पुढे जाऊन मधल्या फळीतील आणखी ४ फलंदाजांना बाद केलं. आयपीएलमध्ये (IPL) पदार्पणातच ४ बळी घेणारा तो चौथा गोलंदाज आणि मुंबईचा पहिलाच गोलंदाज ठरला.
अश्वनी कुमारने (Ashwani Kumar) २०१९ मध्ये पंजाबकडून पदार्पण केलं. पण, त्यानंतर ३ – ४ वर्षांत त्याला फारशी संधी मिळाली नाही. वेळोवेळी झालेल्या दुखापतींमुळे तो बाजूला पडला होता. पण, संधी मिळाल्यावर त्याने कायम चांगली कामगिरी केली आहे, असं पंजाबचे माजी क्रिकेटपटू मनदीप सिंग (Mandeep Singh) यांनी समालोचन करताना सांगितलं.
(हेही वाचा – National War Museum : पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारकात जायला किती शुल्क आकारावे लागतात?)
‘अश्वनी (Ashwani Kumar) क्रिकेटला वाहिलेला आहे. मोहाली जवळच्या खेड्यातून तो नियमितपणे मोहालीत सरावासाठी यायचा. २०२४ मध्येच त्याला नोकरीची संधी चालून आली होती. त्याची आर्थिक फरफट थांबली असती. पण, त्यामुळे पंजाबमधून बाहेर जायला लागेल, म्हणून त्याने ही नोकरी पत्करली नाही. तो गरिबीत पण, क्रिकेट खेळत राहिला. आता त्याचं फळ त्याला मिळतंय,’ असं मनदीप (Mandeep Singh) म्हणाला.
महत्वाचं म्हणजे अश्वनी १४० किमी प्रती तास वेगाने गोलंदाजी करू शकतो. त्याच्या गोलंदाजीत चेंडू वळवण्याची हातोटी आहे. शिवाय यॉर्कर आणि बाऊन्सरही तो प्रभावीपणे वापरू शकतो. त्यासाठीच मुंबई इंडियन्सनी (Mumbai Indians) त्याची निवड केली होती. मुंबई इंडियन्ससाठी झालेल्या निवड चाचणीत अश्वनी (Ashwani Kumar) सहभागी झाला होता. आणि तिथे मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांनी त्याची निवड केली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community