- ऋजुता लुकतुके
भारताचा ऑलिम्पिक चॅम्पियन आणि विश्वविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रासाठी गुरुवारचा दिवस खास होता. कारण, त्याची भेट टेनिसमधील दिग्गज खेळाडू रॉजर फेडररशी झाली. झ्युरिचमध्ये स्वीत्झर्लंड टुरिझमच्या एका कार्यक्रमात दोघांची भेट झाली. आपल्यासाठी हा स्वप्नपूर्तीचा दिवस असल्याची प्रतिक्रिया नीरज चोप्राने दिली आहे. (When Neeraj Met Federer)
झ्युरिचमधील ला रिझर्व्ह एडन तळ्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम झाला. आणि तलावातील पाण्याची शीतलता दोन स्टार खेळाडूंच्या वागण्यातही दिसली. दोघांनी एकमेकांबद्दल कौतुक आणि आदराची भावना व्यक्त केली. स्वीत्झर्लंड टुरिझमनेही २० ग्रँडस्लॅम विजेतेपदं नावावर असलेला फेडरर आणि भालाफेकीतील सध्याचा स्टार नीरज यांची भेट अनौपचारिक राहील आणि त्यांना गप्पांसाठी वेळ मिळेल अशीच ठेवली होती. आणि दोघांनी या वेळेचा आनंद लुटत एकमेकांच्या खेळाविषयी जाणून घेतलं. (When Neeraj Met Federer)
An absolute honour to meet a sporting icon, whose career has been and continues to be an inspiration to people.
I had a great time talking to you, and hopefully we’ll meet again. @rogerfederer 🙏 pic.twitter.com/kQUjiiBdB9
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) January 25, 2024
(हेही वाचा – Jio-OnePlus Partnership : देशात ५जी सेवेच्या विस्तारासाठी रिलायन्स जिओ आणि वन प्लस फोन कंपनी एकत्र)
‘जिगर आणि निर्धार यांच्या जोरावर नीरज चोप्राने केलेली कामगिरी अतुलनीय आहे. आपल्या देशाला अभिमान वाटावा अशी त्याची वाटचाल आहे,’ असं फेडररने यावेळी नीरजबद्दल बोलताना सांगितलं. तर २६ वर्षीय नीरजने आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा असल्याची भावना व्यक्त केली. (When Neeraj Met Federer)
‘माझं एक मोठं स्वप्न आज पूर्ण झालं. पण, त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्याचं व्यक्तिमत्त्व आणि लोकांशी मिळून मिसळून वागण्याची शैली मला आज जास्त भावली,’ असं नीरजने बोलून दाखवलं. (When Neeraj Met Federer)
फेडररने त्याची स्वाक्षरी असलेली रॅकेट चोप्राला भेट दिली. तर चोप्राने आपली ऑलिम्पिक जर्सी स्वाक्षरी करून फेडरेरला दिली. (When Neeraj Met Federer)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community