Asian Games 2023 : आशियाई खेळांसाठी निवड झालेल्या खेळाडूंना जेव्हा नातेवाईक जर्सी प्रदान करतात 

आशिया खेळांसाठी निवड झालेल्या हॉकीपटूंना जर्सी प्रदान करण्यासाठीचा यंदाचा सोहळा अनोखा होता. महिला आणि पुरुष खेळाडूंना जर्सी प्रदान करण्यात आली ती त्यांच्या घरच्या लोकांच्या हस्ते 

123
Asian Games 2023 : आशियाई खेळांसाठी निवड झालेल्या खेळाडूंना जेव्हा नातेवाईक जर्सी प्रदान करतात 
Asian Games 2023 : आशियाई खेळांसाठी निवड झालेल्या खेळाडूंना जेव्हा नातेवाईक जर्सी प्रदान करतात 

ऋजुता लुकतुके

गुरुवारी (३१ ऑगस्ट) बंगळुरूमध्ये रंगलेला कार्यक्रम थोडा वेगळा होता. सौरन कटारिया या कार्यक्रमासाठी हरिद्वार जवळच्या आपल्या गावातून खास विमानाने बंगळुरूला आल्या होत्या. त्यांच्या हस्ते त्यांची मुलगी वंदनाला हॉकीची जर्सी देण्यात आली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाणीच आलं. टोकयो ऑलिम्पिक पूर्वी काही महिने वंदनाच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर मुलीची आधी ऑलिम्पिक संघात निवड झाली आणि आता ती आशियाई खेळांसाठी होआंगझाओला जाणार आहे. आणि त्यासाठी मुलीला जर्सी प्रदान करण्याचा मान त्यांना मिळाला होता. राहून राहून सौरन यांना आपल्या पतीची आठवण येत होती.

सौरन यांच्यासारखीच अवस्था महिला आणि पुरुष संघातील खेळाडूंच्या कुटुंबीयांची झाली होती. आणि या सोहळ्याचे आयोजक होते हॉकी इंडिया. खेळाडूंना जर्सी देण्याचा कार्यक्रम एरवी उपचारापूरता असतो. यंदा हॉकी इंडियाने खेळाडूंच्या अख्ख्या कुटुंबाला बोलावून त्याचा सोहळा केला.

या कार्यक्रमा मागची संकल्पनाही हॉकी इंडियाने विचारपूर्वक आखली होती. हॉकीपटू वर्षाचे २७० दिवस सामन्यांसाठी घराबाहेर असतात. त्यामुळे खेळाडूंना स्पर्धेसाठी अलविदा करताना जर कुटुंबीय बरोबर असतील तर तो सोहळा खेळाडूंसाठी संस्मरणीय होईल, असं हॉकी इंडियाला वाटलं आणि त्यातून ही कल्पना पुढे आली. या कार्यक्रमाला नाव दिलं होतं ‘सुनेहरा सफर.’

(हेही वाचा-Rule Change : देशात 1 सप्टेंबर पासून होणार ‘हे 11’ मोठे बदल

पुरुष संघातील २३ वर्षीय मिड-फिल्डर विवेक सागर प्रसाद या कार्यक्रमामुळे भारावून गेला होता. ‘यापेक्षा चांगला सेंड-ऑफ मला मिळालाच नसता,’ असं तो म्हणाला.

भारताचा ज्येष्ठ गोलकीपर श्रीजीश आपल्या अनुश्री आणि श्रीयांश या दोन मुलांना घेऊन आला होता. तर कर्णधार हरमनप्रीत सिंगची अडीच वर्षांची मुलगी रुहावतही कार्यक्रमासाठी आली होती. श्रीजेशची पत्नी अनिस्या पत्रकारांशी बोलताना म्हणाली, ‘मला नेहमीच माझ्या पतीचा अभिमान होता. पण, त्याला मोठ्या स्पर्धेची जर्सी प्रदान करणं. आणि ते सुद्धा आमच्या दोन मुलांच्या उपस्थितीत, हा क्षण केवळ संस्मरणीय होता.’

हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांच्या डोक्यातील ही कल्पना होती. ते स्वत: खेळाडू असल्यामुळे खेळाडूंची मानसिकता लक्षात घेऊन त्यांनी या कार्यक्रमाची आखणी केली होती. ‘खेळाडूंच्या मागे कुटुंबीयांचं पाठबळ महत्त्वाचं असतं. नातेवाईकांच्या त्यागामुळेच खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करू शकतो. म्हणून खेळाडूंना जर्सी कुटुंबीयांच्या हस्ते द्यावी असं आम्ही ठरवलं,’ असं तिर्की मीडियाशी बोलताना म्हणाले.

आशियाई खेळांसाठी भारतीय पुरुष संघाचं नेतृत्व हरमनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आलं आहे. तर हार्दिक सिंग संघाचा उपकर्णधार आहे. भारतीय संघाचा समावेश अ गटात करण्यात आलाय. आणि या गटात भारताबरोबर जपान, सिंगापूर, पाकिस्तान, उझबेकिस्तान आणि बांगलादेश हे देश आहेत. तर स्पेनमध्ये खेळलेला महिलांचा संघ आशियाई खेळांसाठी कायम ठेवला आहे. कर्णधारपदीही सविता कायम आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.