Sachin – Vinod Reunite : आचरेकर सरांच्या निमित्ताने सचिन आणि विनोद जेव्हा पुन्हा एकाच व्यासपीठावर येतात

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे क्रिकेटमधील जुने मित्र आहेत.

172
सचिन तेंडुलकर आणि Vinod Kambli अजून मित्र आहेत का?
सचिन तेंडुलकर आणि Vinod Kambli अजून मित्र आहेत का?
  • ऋजुता लुकतुके

मुंबईतील लोकप्रिय क्रिकेट प्रशिक्षक, सचिन आणि विनोदचे कोच म्हणून ओळख असलेले रमाकांत आचरेकर (Ramakant Achrekar) यांच्या स्मृतीस्थळाचं उद्घाटन मंगळवारी शिवाजीपार्कवर झालं तेव्हा अर्थातच मुंबई क्रिकेटचे सगळे दिग्गज क्रिकेटपटू या सोहळ्याला उपस्थित होते. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आम्रे, बलविंदर सिंग संधू, अतुल रानडे, चंदू पंडित असे सगळेच आचरेकर सरांचे शिष्य या कार्यक्रमाला हजर होते. आणि त्यांनी सरांच्या आठवणीही जागवल्या. या कार्यक्रमाचं आकर्षण ठरलं ते सचिन आणि विनोद यांची पुनर्भेट. (Sachin – Vinod Reunite)

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विनोद कांबळी (Vinod Kambli) हे रमांकात आचरेकरांचे (Ramakant Achrekar) सर्वोत्तम शिष्य मानले जातात. दोघांची मैत्रीही अतूट होती. पण, अलीकडे दोघांमध्ये फारसं सख्य नसल्याच्या बातम्या येत होत्या. पण, या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघे जुने मित्र एकाच व्यासपीठावर आले. आणि सचिनने विनोदला पाहताच उठून त्याचं स्वागत केलं.

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहली सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमापासून एक पाऊल दूर)

सचिन आणि विनोद (Sachin – Vinod Reunite) यांनी शारदाश्रम शाळेतून खेळताना हॅरिस शिल्ड स्पर्धेत विश्वविक्रमी ६६४ धावांची भागिदारी केली होती. यात विनोदचा वाटा होता ३४९ धावांचा. तर सचिनचा वाटा होता ३२६ धावांचा. शालेय क्रिकेटमधील हा विक्रम होता. आणि तेव्हापासूनच या जोडीने भारतीय आणि जागतिक क्रिकेटमध्ये ओळख निर्माण केली होती. पुढे सचिन भारताकडून २०० कसोटी खेळला. आणि यात त्याने फलंदाजीचे सगळे विक्रम केले. तर विनोद काहीसा मागे राहिला. तो १७ कसोटीच खेळू शकला. सुरुवात चांगली होऊनही विनोदला कामगिरीत सातत्य टिकवता आलं नाही. दोन द्विशतकांसह त्याने फक्त १,०८४ कसोटी धावा केल्या.

या कार्यक्रमात मात्र विनोदने सरांच्या आठवणींसाठी एक गाणंही पेश केलं. ‘सर जो तेरा टकराये,’ हे गाणं त्याने आचरेकर सरांना समर्पित केलं.

(हेही वाचा – Chembur मध्ये डिजिटल अरेस्ट मध्ये १२ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक)

विनोद गाणं म्हणत असताना सचिन आणि इतर व्यासपीठावरील मान्यवरांनी ठेका धरला होता. सचिननेही रमाकांत आचरेकरांच्या आठवणी जागवल्या. आणि त्यांनी पहिलं किट दिलं नसतं तर क्रिकेटपटू झालो नसतो, असं सचिन म्हणाला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.