Virat Kohli : जेव्हा विराट कोहली अख्ख्या संघाच्या एक दिवस आधी ऑस्ट्रेलियाला पोहोचतो

इतर खेळाडू रविवारी आणि सोमवारी ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत.

82
Virat Kohli : विराट कोहलीचं ऑस्ट्रेलियातील लाडकं शतक कुठलं?
Virat Kohli : विराट कोहलीचं ऑस्ट्रेलियातील लाडकं शतक कुठलं?
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) शनिवारी ०९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री मुंबई विमानतळावर चाहत्यांना दिसला होता. आणि यावेळी त्याने काहीजणांबरोबर सेल्फीही काढले होते. मुंबईहून विराट कोहली (Virat Kohli) अर्थातच ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. आणि रविवारी १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळीच तो तिथे पोहोचला आहे. विशेष म्हणजे इतर कुठल्याही भारतीय खेळाडूच्या एक दिवस आधी तो ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. बाकीचे खेळाडू सोमवारी आणि मंगळवारी तिथे पोहोचत आहेत. विराट मात्र एक दिवस आधीच तिथे पोहोचला आहे.

(हेही वाचा – Maharashtra Assembly 2024 : राज्यात प्रचाराचा धुरळा, पंतप्रधान मोदींच्या ३, तर राहुल गांधींच्या २ सभा होणार!)

‘उर्वरित भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये पर्थला पोहोचणार आहे. आणि प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) दुसऱ्या तुकडीबरोबर मंगळवारी तिथे पोहोचतील. पण, विराट एक दिवस आधीच पोहोचला आहे. त्याने जाणीवपूर्वक तसा निर्णय घेतला आहे,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. विराटची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि त्यांची दोन मुलं विराटला (Virat Kohli) सोडण्यासाठी मुंबई विमानतळावर आली होती. शनिवारी मध्यरात्रीच तो पर्थसाठी निघाला.

यावर्षी कसोटीत विराट फारसा फॉर्ममध्ये नाही. आणि एकूणच गेल्या पाच वर्षांमध्ये त्याने फक्त २ कसोटी शतकं केली आहेत. त्यामुळे आधीचं अपयश त्याला बोर्डर – गावसकर मालिकेत भरून काढायचं आहे. त्याच इराद्याने विराट आधी तिथे पोहोचल्याचं कळतंय. भारतीय संघाला तिथे सराव सामना खेळायला मिळणार नाहीए. पण, भारतीय ए संघ आधीपासून तिथे आहे. त्या संघाबरोबर राष्ट्रीय अधिकृत संघाचा एक सराव सामना आयोजित करण्यात येणार आहे.

रविवारी ऑस्ट्रेलियाला रवाना झालेल्या तुकडीत यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर आणि सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर हे होते. तर सोमवारी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, उपकर्णधार जसप्रीत बुमराह आणि उर्वरित संघ सिंगापूर मार्गे पर्थला रवाना झाला. २२ नोव्हेंबरला पहिली कसोटी पर्थ इथंच रंगणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.