-
ऋजुता लुकतुके
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने ४ पैकी ३ सामने गमावल्यानंतर आता संघाला गरज आहे ती एका मोठ्या धक्क्याची. आधीच पराभवाची मालिका संपत नसताना संघाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मालाही (Rohit Sharma) गुडघ्याची दुखापत सुरू झाली आहे. अशावेळी चाहत्यांना आनंदी करणारी बातमी खुद्द कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) दिली आहे. पाठीदुखीनंतरच्या पुनर्वसन कार्यक्रमासाठी बुमराह (Jasprit Bumrah) सध्या बीसीसीआयच्या (BCCI) बंगळुरूमधील क्रिकेट अकादमीत आहे. आणि तो लवकरच मुंबईच्या ताफ्यात शामील होईल, असा आशावाद कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) व्यक्त केला आहे.
‘जसप्रीत लवकरच संघात येईल,’ इतकंच तो म्हणाला. तो नेमका कधी संघात येईल हे ही त्याने सांगितलं नाही. पण, त्याच्या या एका वाक्याने चाहत्यांमध्ये आनंदाची लहर उमटली आहे. बुमराहने (Jasprit Bumrah)ब नेट्समध्ये गोलंदाजी सुरू केल्याचा व्हिडिओ अलीकडेच व्हायरल झाला होता.
(हेही वाचा – IPL 2025, Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या नावावर आयपीएलमध्ये अनोखा विक्रम)
🚨 Toss 🚨
Mumbai Indians won the toss and opted to bowl first against Lucknow Super Giants.
Updates ▶️ https://t.co/HHS1Gsaw71#TATAIPL | #LSGvMI | @LucknowIPL | @mipaltan pic.twitter.com/sMnXPV2Xnx
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2025
(हेही वाचा – IPL 2025, MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा ४ सामन्यांत तिसरा पराभव, फलंदाज पुन्हा अपयशी )
बुमराहच्या (Jasprit Bumrah) अनुपस्थितीत ट्रेंट बोल्ट (Trent Boult) आणि हार्दिक पंड्यावर (Hardik Pandya) मुंबईच्या तेज गोलंदाजीची जबाबदारी आली आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबईने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धचा सामना ४ गडी राखून गमावला. तर दुसरा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) ३६ धावांनी गमावला. कोलकाता फ्रँचाईजीविरुद्ध मुंबईने विजय मिळवला असला, तरी लगेचच लखनौविरुद्धचा सामना त्यांनी गमावला आहे. आता नवीन अपडेटनुसार, एप्रिलच्या मध्यावर बुमराह मुंबई इंडियन्समध्ये शामील होऊ शकेल. २०१३ मध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पहिल्यांदा मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians) करारबद्ध झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध बुमराह आपला पहिला सामना खेळला होता. आणि या सामन्यात त्याने ३२ धावांमध्ये ३ बळीही मिळवले होते.
तेव्हापासून तो कायम मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) भाग राहिला आहे. आतापर्यंत १३२ सामन्यांमध्ये त्याने १६५ बळी मिळवले आहेत. आयपीएलमध्ये (IPL 2025) डावांत ५ बळी दोनदा टिपणाऱ्या मोजक्या चार गोलंदाजांमध्ये एक जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community