PV Sindhu Wedding : पी व्ही सिंधूचा भावी नवरा वेंकट दत्ता साई कोण आहे?

PV Sindhu Wedding : वेंकट दत्ता साईने आयपीएल संघाबरोबरही काम केलं आहे.

80
PV Sindhu Wedding : पी व्ही सिंधूचा भावी नवरा वेंकट दत्ता साई कोण आहे?
PV Sindhu Wedding : पी व्ही सिंधूचा भावी नवरा वेंकट दत्ता साई कोण आहे?
  • ऋजुता लुकतुके

दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू (PV Sindhu) येत्या २२ डिसेंबरला उदयपूर इथं पारंपरिक सोहळ्यात विवाहबद्ध होणार आहे. तिचा वाङदत्त वर वेंकट दत्ता साई (Venkata Dutta Sai) हा हैद्राबादमधील टेकी असून पॉसिडेक्स टेक्नॉलॉजीज् कंपनीत तो कार्यकारी संचालक म्हणून काम करतो. रविवारी सिंधूने लखनौ इथं सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यानंतर काही दिवसांतच तिच्या कुटुंबीयांकडून ही बातमी समोर आली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, २० डिसेंबर ते २२ डिसेंबर उदयपूर इथं पारंपरिक पद्धतीने विवाहाचे विधी पार पडतील. त्यानंतर २४ डिसेंबरला हैद्राबाद इथं स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. (PV Sindhu Wedding)

‘दोन्ही कुटुंबं एकमेकांना बरीच वर्षं ओळखत होती. पण, विवाहाचा प्रस्ताव गेल्या महिन्यातच आला. आणि सिंधूचा पुढील कार्यक्रम व्यस्त असल्यामुळे डिसेंबरमध्येच घाई घाईने विवाह सोहळा पार पडेल,’ असं सिंधूचे वडील वेंकट रमणा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे. लग्नानंतर लगेचच सिंधू तिच्या सरावाला सुरुवात करेल, असं वेंकट (Venkata Dutta Sai) यांनी सांगितलं आहे. (PV Sindhu Wedding)

(हेही वाचा – शपथविधी सोहळ्यापूर्वी Devendra Fadnavis यांनी महाकाल मंदिराकडून मागवला भस्म-प्रसाद; पुजाऱ्यांनाही निमंत्रण)

सिंधूचा वाङदत्त वर वेंकटा दत्ता साई हा हैद्राबादचा असून त्याने लिबरल स्टडीज विषयात पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यानंतर २०१८ मध्ये अकाऊंटिंग आणि फायनान्सचा अभ्यासक्रम त्याने फ्लेम विद्यापीठातून पूर्ण केला आहे. बंगळुरूच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी मधून त्याने मशिन लर्निंग आणि डेटा सायन्स विषयात स्नातकोत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. (PV Sindhu Wedding)

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहली सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमापासून एक पाऊल दूर)

वेंकट (Venkata Dutta Sai) यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर पहिली नोकरी जेएसडब्ल्यू समुहात केलेली दिसते. तिथेच ते इन्टर्न म्हणूनही काम करत होते. या कंपनीकडे तेव्हा दिल्ली कॅपिटल्स संघाची मालकी होती. त्यामुळे वेंकट दत्ता यांनी डेटा ॲनालिस्ट म्हणून आयपीएलमध्येही (IPL) काम केलं आहे. ‘फायनान्स आणि अर्थशास्त्रातील अभ्यासक्रमासमोर आयपीएल संघ व्यवस्थापन हे खूप वेगळं काम होतं. पण, या दोन्ही अनुभवांनी मला खूप काही शिकवलं आहे,’ असं वेंकट यांनी आपल्या लिंक्डइन प्रोफाईलवर लिहिलं आहे. (PV Sindhu Wedding)

जेएसडब्ल्यू कंपनीनंतर वेंकट यांची कक्षा रुंदावत गेली आहे. आणि सॉवर ॲपल मॅनेजमेंट कंपनीपासून त्यांनी अनेक जबाबदारीची आणि नेतृत्वाची पदं सांभाळलेली दिसतात. सध्या पॉसिडेक्स कंपनीत ते कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतात. बॅडमिंटन आणि त्यातही सिंधूचे ते चाहते आहेत. (PV Sindhu Wedding)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.