- ऋजुता लुकतुके
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यात गुजरात संघाने २० षटकांत ४ बाद १९९ धावा केल्या होत्या. आणि कर्णधार शुभमन गिलच्या नाबाद ८९ धावांच्या खेळीची चर्चाही सुरू झाली होती. आणि २०० धावांच्या दडपणाखाली पंजाबची आघाडीची फळी स्वस्तात कोसळली होती. संघाची धावसंख्या होती ५ बाद १११. शशांक सिंग या सगळ्या पडझडीत मैदानावर होता. पण, फारसं कुणाचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. (Who is Shashank Singh)
शिखर धवन आणि सॅम करन हे पंजाब संघातील स्टार खेळाडू. आणि असं तगडं आव्हान समोर असताना अपेक्षा होत्या त्या त्यांच्याकडूनच. पण, आयपीएल लिलावात ज्याच्या खरेदीनंतर पंजाब संघ प्रशासनही गोंधळलं होतं, तो शशांक सिंग (Shashank Singh) संघासाठी तारणहार ठरला. त्याने २९ चेंडूंत ६१ धावा केल्या त्या ४ षटकार आणि ६ चौकारांच्या जोरावर. सहाव्या क्रमांकावर येऊन त्याने संघाला असाध्य विजय मिळवून दिला. (Who is Shashank Singh)
पण, डिसेंबर २०२३ मध्ये खेळाडूंचा लिलाव झाला तेव्हा पंजाब किंग्जचे मालक नेस वाडिया आणि प्रीती झिंटाही शशांक सिंगचं नाव आल्यावर गोंधळून गेले होते. आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेल्या शशांक सिंगचं (Shashank Singh) नाव लिलावाची यजमान मल्लिका सागरने पुकारलं. पंजाब संघाने बोली लावली. आणि नंतर झिंटा आणि वाडिया गोंधळलेले दिसले. दोघंही हातातील कागद सारखे तपासून बघत होते. आणि तोपर्यंत लिलावाचा दंड खाली आला. म्हणजेच पंजाबने शशांक सिंगला (Shashank Singh) विकत घेतल्यावर शिक्कामोर्तब झालं. पंजाब संघ प्रशासन अजूनही गोंधळलेला होता. मल्लिका सागरही गोंधळलेली होती. अखेर या सगळ्या प्रकारानंतर पंजाब संघ प्रशासनाने पुढे येऊन आपली बाजू मांडली होती. शशांक सिंग संघाला हवाच होता, नावाच्या गोंधळामुळे लिलावाच्या वेळी गोंधळलेली परिस्थिती उद्भवली, असं स्पष्टीकरण संघ प्रशासनाने एक ट्विट करून दिलं. (Who is Shashank Singh)
Two players of similar names on the IPL list created confusion. I am delighted to share that the right Shashank Singh has been onboarded. He has put out some noteworthy performances, and we’re ready to unleash his talent.
– Satish Menon
CEO, Punjab Kings.— Punjab Kings (@PunjabKingsIPL) December 20, 2023
(हेही वाचा – मनसे महायुतीत सहभागी होणार का? Raj Thackeray गुढी पाडव्याच्या सभेत करणार उलगडा)
शशांकला पंजाब फ्रँचाईजीने घेतलं विकत
लिलावाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंचा लिलाव सुरू असताना शशांक सिंगचं (Shashank Singh) नाव समोर आलं. प्रीती झिंटाने त्याच्यासाठी हात वर केला. आणि इतर कुणीही बोली न वाढवल्यामुळे २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत शशांक सिंग (Shashank Singh) पंजाबकडे आला. प्रीती झिंटाने हात वर केल्यानंतर काही काळ पंजाब प्रशासन गोंधळलेलं दिसलं. पण, कुणीही सौदा रद्द केला नाही. शेवटी शशांकला पंजाब फ्रँचाईजीने विकत घेतलं. (Who is Shashank Singh)
शशांकने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ५८ टी-२० सामन्यांत १३७ च्या स्ट्राईक रेटने ७५४ धावा केल्या आहेत. ३२ वर्षांचा हा अष्टपैलू खेळाडू छत्तीसगडकडून खेळतो. यापूर्वी सनरायझर्स हैद्राबाद, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि राजस्थान रॉयल्सकडून तो आयपीएल खेळलेला आहे. (Who is Shashank Singh)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community