मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) आगामी हंगामासाठी हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. रोहित शर्मा गेल्या १० वर्षांपासून संघाचे नेतृत्व करत आहे, पण यावेळी फ्रँचायझीने आगामी हंगामापूर्वी मोठे डील करत आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सने शुक्रवारी १५ डिसेंबरला नेतृत्वात बदल करत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. सर्वात यशस्वी आणि आवडत्या कर्णधारांपैकी एक असलेल्या रोहित शर्माकडून कर्णाधरपद काढून टाकण्यात आले आहे. त्याची जागा आता हार्दिक पांड्या घेणार आहे. असे का ? वाचा सविस्तर…
हार्दिक पांड्याने कर्णधार म्हणून आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. २०२२ मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने प्रथमच विजेतेपद पटकावले होते. २०२२ च्या लिलावापूर्वी मुंबईने हार्दिकला सोडले, पण २०२४च्या लिलावापूर्वी हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. आता संघाने रोहितकडून कर्णधारपद काढून घेतले आणि हार्दिक पांड्याला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले.
(हेही वाचा – Weapons Cache Seized : मुसाफिरखान्यात हत्यारांचा जखीरा जप्त, एकाला अटक)
संघाला पुन्हा विजेतेपद मिळवून देण्याची आशा…
गुजरात टायटन्सने हार्दिकला त्यांच्या संघाचा भाग बनवले आणि त्याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले. यानंतर हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने आपल्या पहिल्याच हंगामात विजेतेपद पटकावले होते. गेल्या आयपीएल हंगामात गुजरातने अंतिम फेरीही गाठली होती. कर्णधार म्हणून, हार्दिकने आयपीएलच्या मागील 2 हंगामात शानदार कामगिरी केली. त्यामुळे आता सर्वांना आशा आहे की, रोहितप्रमाणेच हार्दिकही मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवण्यात आणि संघाला पुन्हा विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
(हेही वाचा – MHADA : म्हाडाच्या ५६ वसाहतींचे वाढीव सेवा शुल्क माफ; अतुल सावेंची घोषणा)
११ हंगामांसाठी संघाचे नेतृत्व…
– हार्दिक पांड्या २०१५ ते २०२१ पर्यंत मुंबई इंडियन्स संघासोबत आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २०२१ च्या हंगामापर्यंत या संघाकडून खेळताना त्याने चमकदार कामगिरी करून टीम इंडियामध्ये आपले स्थान पक्के केले होते.
– महेंद्रसिंग धोनीनंतर रोहित शर्मा आयपीएल सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने १५८ सामन्यात मुंबईचे नेतृत्व केले आणि ८७ सामने जिंकले.
– २०१३ च्या मोसमात रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले होते. संघ कठीण परिस्थितीत होता. अशा परिस्थितीमध्येही रोहितने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2015, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये मुंबई इंडियन्स रोहितच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनला. त्याने ११ हंगामांसाठी संघाचे नेतृत्व केले आणि ५ वेळा संघाला चॅम्पियन बनवले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community