- ऋजुता लुकतुके
अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने रविवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला. आणि विशेष म्हणजे या संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. तर संघात विराट कोहलीचाही समावेश आहे. दोघंही २०२२ च्या टी-२० विश्वचषकातील पराभवानंतर पहिल्यांदा भारतासाठी टी-२० खेळतील. तर या संघात सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांचा दुखापतीमुळे समावेश झालेला नाही.
जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी एक एकमेव आंतरराष्ट्रीय टी-२० मालिका आहे. अशावेळी आता निवडलेल्या संघावरून आपल्याला विश्वचषकासाठीच्या भारतीय संघाची कल्पना येऊ शकते. आणि संघाची रणनीतीही समजू शकते.
बीसीसीआयने संध जाहीर झाल्यानंतर ट्विटरवर हा संघ जाहीर करताना, ‘ॲक्शन पॅक्ड संघ,’ असं या संघाबद्दल म्हटलं आहे.
(हेही वाचा – Maulana firing : हिंदूंविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या पाक मौलानाची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल)
What do you all make of this power-packed T20I squad set to face Afghanistan? 😎#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/pY2cUPdpHy
— BCCI (@BCCI) January 7, 2024
एरवी जगातील कुठल्याही क्रिकेट संघात रोहित आणि विराटचा समावेश झाला तरी त्याचं कुणाला आश्चर्य वाटायला नको. पण, दोघंही आता अनुक्रमे ३६ आणि ३५ वर्षांचे आहेत. आणि २०२२ मधल्या टी-२० विश्वचषकानंतर या दोघांनीच जवळ जवळ तिथून पुढे टी-२० न खेळण्याचा संदेश दिला होता. अशावेळी या दोघांची संघात वापसी आपल्याला नेमकं काय सांगते?
अफगाणिस्तानविरुद्ध हे दोघं खेळणार हा स्पष्ट संकेत आहे की, दोघंही टी-२० विश्वचषकातही खेळणार. आणि बीसीसीआयलाही विश्वचषकातील संघाची उभारणी या दोघांभोवतीच करायची आहे. नुकताच संपलेला एकदिवसीय विश्वचषक या दोन ज्येष्ठ खेळाडूंनी गाजवला. रोहितने तरुणांना लाजवेल अशा थाटात संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. तर विराटने अख्खी ५० षटकं खेळून काढण्याच्या इराद्याने तरीही जलद आणि महत्त्वाचं म्हणजे ९१ धावांच्या सरासरीने ७६५ धावा जमवल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community