का चुकतात हल्लीच्या अंपायर्सचे निर्णय? माधव गोठोस्करांनी सांगितली कारणे

118

भटजींशिवाय जसं कुठलंही शुभकार्य होऊ शकत नाही, तसंच अंपायरशिवाय कुठलाही खेळ खेळता येऊ शकत नाही. प्रत्येक खेळात अंपायर किंवा रेफ्री हा असतोच असतो. आता क्रिकेटच्या मॅचमध्ये एकदा का अंपायरने बोट वर केलं की खेळाडूला पॅव्हेलियनचा रस्ता धरावा लागतो. आता जरी डीआरएस सिस्टीम आली असली, तरी अंपायर्स कॉलमुळे अनेकदा खेळाडूच्या चांगल्या खेळीचा खेळखंडोबा झाल्याचं आपल्याला पहायला मिळालं आहे. अंपायरच्या चुकीच्या निर्णयांना आजवर अनेक खेळाडू बळी पडले आहेत. पण अंपायरच्या या चुकीच्या निर्णयांमागची कारणे सांगितली आहेत, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ अंपायर माधव गोठोस्कर यांनी.

94 वर्षीय माधव गोठोस्कर यांना आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये अंपायरिंगचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवावरुनच त्यांनी अंपायरचे निर्णय चुकण्याची कारणे हिंदुस्थान पोस्टला सांगितली आहेत.

Gothoskarjpg

(हेही वाचाः मराठमोळ्या माणसाच्या सहीमुळे पाकिस्तानात नोटांना ‘किंमत’ होती, बघा कशी होती नोट)

‘झुकूंगा नही’ भूमिकेचा फटका

पुष्पा सिनेमातील झुंकूंगा नही भूमिकेप्रमाणेच, मी कोणापुढे वाकणार नाही, अशी हल्लीच्या अंपायरची वृत्ती झालेली आहे. आम्ही स्टंपच्या लेव्हलला राहून अंपायरिंग करत असू, त्यामुळे बॉलचा टप्पा नेमका कुठे पडलाय, टप्पा पडून तो स्टंपच्या बाहेर जात आहे का, या गोष्टी समजणे सोपे जात होते. त्यामुळे त्यावेळी पायचीत(LBW)चे निर्णय फारसे चुकत नसत. या सवयीमुळेच त्यावेळच्या अंपायरिंगवर लोकांचा विश्वास होता, असे गोठोस्कर यांनी सांगितले.

70564379

(हेही वाचाः नोटांवरच्या ‘या’ छोट्या अक्षरांमध्ये दडलंय मोठं ‘गुपीत’)

अंपायर्स असतात दडपणाखाली

हल्लीच्या अंपायर्सना आपल्या माथी चुकीच्या निर्णयांचं खापर फोडून घ्यायचं नसतं, त्यामुळे खेळाडू आऊट आहे हे माहीत असताना सुद्धा, ते रन आऊटच्या डिसिजनसाठी सतत थर्ड अंपायरकडे बोटं दाखवतात. तसेच हल्ली टीव्ही आणि स्टेडियममध्ये असलेल्या मेगा स्क्रीनवर सगळ्या गोष्टी या स्पष्टपणे दिसत असल्यामुळे, अंपायरच्या आधीच प्रेक्षकांना निर्णय कळलेला असतो. त्यामुळे आपली चूक ही जगासमोर येण्याची त्यांना भीती असते. म्हणूनच हल्लीचे अंपायर हे थोडे दडपणाखाली आलेले असतात, असे मत माधव गोठोस्कर यांनी व्यक्त केले आहे.

dgtnekm8 tim paine run out

(हेही वाचाः तुमच्या खिशातली नाणी कुठून आली आहेत, हे कसं ओळखाल? ही आहे ‘ट्रिक’)

कौतुक नाही

कमेंटेटरकडून कायम खेळाडू्ंच्या खेळाचंच कौतुक केलं जातं. पण एखाद्या अंपायरने समजा चांगला निर्णय दिला तर त्याचं फारसं कौतुक होताना दिसत नाही. पण एखादा निर्णय चुकीचा दिला गेला तर मात्र त्या अंपायरच्या नावाचा चांगलाच उद्धार केला जातो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.