भारतीय क्रिकेटचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमधून पूर्णपणे सावरत, अखेर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतला आहे. बुमराहने संघाचा सराव कॅम्प जॉईन केला असून, मुंबई इंडियन्सने याबाबतची अधिकृत घोषणा रविवारी (दि.६) सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करत केली आहे. (Jasprit Bumrah)
𝑹𝑬𝑨𝑫𝒀 𝑻𝑶 𝑹𝑶𝑨𝑹 🦁#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL pic.twitter.com/oXSPWg8MVa
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2025
बुमराह पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे सराव करत होता. त्याच्या पुनरागमनाबद्दल अजूनही सस्पेन्स आहे. पण आता बुमराह आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यामध्ये सामील झाला आहे अशी बातमी समोर येत आहे. ७ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा सामना मुंबईच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. (Jasprit Bumrah)
The King of the jungle is back in his kingdom 🦁🔥#MumbaiIndians #PlayLikeMumbai pic.twitter.com/oZMIiSiEm5
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2025
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा विश्वासू वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आपल्या कामगिरीने संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे. आतापर्यंत १३३ सामन्यांत १६५ बळी घेतलेले बुमराह मुंबई इंडियन्ससाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याचा बळी मिळवण्याचा सरासरी दर २२.५२ असून त्याने २३ वेळा तीन बळी घेतले आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी ५ बळी केवळ १० धावांत आहे. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सने ज्या हंगामांमध्ये विजेतेपद मिळवले – २०१७ (२० बळी), २०१९ (१९ बळी) आणि २०२० (२७ बळी) – त्या प्रत्येक वेळी बुमराह संघाचा प्रमुख यशस्वी गोलंदाज ठरला. त्याच्या दमदार आणि अचूक माऱ्यामुळेच मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. (Jasprit Bumrah)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community