इंडियन प्रीमियर लीग २०२३चा ४३व्या सामन्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या ४३व्या झालेल्या सामन्यातील लखनऊ विरुद्ध बंगळूरची लढत वेगळ्याच कारणाने चर्चेत राहिली आहे. सोमवारी, १ मेला लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात बंगळुरने विजय मिळवला. लखनऊच्या घरच्या मैदानावर बंगळूर संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर लखनऊचा संघ गोलंदाजीने सामन्याला सुरुवात केली. पण यादरम्यान विराट कोहली लखनऊ खेळाडू नवीन-उल-हक आणि मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्याशी भिडला. आणि यामुळे एकच गोंधळ उडला. पण हा वाद आता सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे.
नक्की काय घडले?
सोमवारी लखनऊ आणि बंगळुरचा दुसऱ्यांदा सामना झाला, त्यात सुरुवातीपासूनच वातावरण चांगलेच तापले होते. दुसऱ्या इंनिगच्या १७व्या षटकात लखनऊचा फलंदाज नवीन-उल-हक आणि विराट कोहली एकमेकांना भिडले. या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मात्र या वेळेस अमित मिश्रा आणि पंचानी मध्यस्थी केली आणि तात्पूरता वाद संपवला. मात्र विराट आणि नवीनच्या डोक्यात हा विषय होता. सामना संपल्यानंतर गौतम गंभीर जेव्हा विराटशी हस्तांदोलन करताना हात झटकला, पुढे जाऊन नवीन बरोबर हस्तांदोलन करताना विराटशी बाचाबाची झाली. पण इथेही जरा मध्यस्थी झाली आणि विषय संपला.
आता इथून पुढे वादाला सुरुवात झाली. आधीच १७ व्या ओव्हरचे प्रकरण, त्यानंतर हस्तांदोलन. आता थेट विराट आणि गौतम गंभीरच आमनेसामने आले. दोघांनी एकमेकांची बाजू सांगण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र हे चित्र पाहून हे मारामारी करतात की काय, असेच वाटत होते. पण तसे सुदैवाने झाले नाही. पण आता हा वाद सोशल मीडियावरही रंगलेला दिसत आहे. विराट आणि नवीनने इन्स्टाग्रामवर अशा काही स्टोअरी शेअर केल्या आहेत, ज्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – IPL 2023 : विराट आणि गंभीर पुन्हा आमनेसामने)
इन्स्टाग्रामवरून एकमेकांना उत्तर
दरम्यान मंगळवारी विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर स्टोअरी टाकली. ज्यामध्ये लिहिलेले की, जे आपण एकतो ते मत असते, आणि जे काही आपण पाहतो तो दृष्टिकोन असतो ते खरे नसते असे लिहिलेले आहे.
तर दुसरीकडे नवीन-उल-हकने तुम्हाला तेच मिळत ज्या पात्रतेचे तुम्ही असता, हे असंच होत आणि हेच व्हायला पाहिजे हे नवीनने आपल्या स्टोअरीवर लिहिलेले होते. यामुळे आता वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community