यंदाचा आयपीएल हंगाम हा बऱ्याच गोष्टीने चर्चेत राहणार आहे. कधी वातावरण तापलेले बघायला मिळाले तर कधी थरारक सामने पाहायला मिळाले. बुधवारी झालेल्या मुंबई विरूद्ध पंजाब सामन्यात हा थरार अनुभवायला मिळाला.
मुंबईने नाणेफेक जिंकून फलंदाजीचे आमंत्रण दिल्यावर पंजाबने सलामवीर प्रभसिमरन सिंगला लवकर गमावले. तसेच शिखर धवन ही जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. दरम्यान लियम लिविंगस्टन आणि जितेश शर्मा यांच्या तडाखेबंद खेळीमुळे २१० धावांचा टप्पा पंजाब गाठू शकला.
या डोंगराएवढ्या लक्ष्याच्या पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा शून्यावर माघारी परतला. ग्रीनने जोरदार फटकेबाजी करायला सुरुवात केलेली पण तो ही बाद झाला, नंतर आलेल्या सूर्यकुमारने इशान बरोबर १११ धावांची जबरदस्त भागीदारी केली. तसेच सूर्या आणि इशानने झंझावती खेळी केली त्यामुळे मुंबईला विजयाच्या जवळ नेले तर तिलक वर्माने षटकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केले.
मुंबईचे साखळीसामने खेळण्याची संधी वाढली
या विजयामुळे मुंबईच्या साखळी सामने खेळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कारण आता बंगळूर, पंजाब राजस्थानच्या जोडीला मुंबईचे ही चान्सेस वाढलेले आहेत. तसेच, तर गुजरात १२ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community