Wimbledon Final 2023 : एका नव्या पर्वाची नांदी

नोव्हाक जोकोव्हिचच्या वर्चस्वाला शह देत वीस वर्षीय कार्लोस अल्काराझ विजयी

192
Wimbledon Final 2023 : एका नव्या पर्वाची नांदी

रविवारी म्हणजेच १६ जुलै रोजी रात्री टेनिस (Wimbledon Final 2023) क्षेत्रातील एका पर्वाचा अंत होऊन दुसऱ्या एका नवीन पर्वाची सुरुवात झाली. यावेळी टेनिस जगताला नवा स्टार मिळाला. केवळ २० वर्षीय कार्लोस अल्कराझ विम्बल्डनचा नवविजेता ठरला. त्याच्या या विजयाने एका नव्या पर्वाची नंदी झाली आहे. अल्कराझ याने ४ तास ४२ मिनिटांच्या सामन्यात ३६ वर्षीय आणि अनुभवी अशा नोव्हाक जोकोव्हिचचा 1-6, 7-6, 6-1, 3-6, 4-6 असा पराभव केला.

सलग ४ वेळा विजेतेपद पटकावत सर्बियाच्या जोकोव्हिच १० वर्षांनंतर विम्बल्डनची (Wimbledon Final 2023) अंतिम फेरी हरला. सन २०१३ मध्ये अंतिम फेरीत त्याला ग्रेट ब्रिटनच्या अँडी मरेने पराभूत केले होते. त्यानंतर आता स्पेनच्या कार्लोस अल्कराझ यांच्याकडून जोकोव्हिच पराभूत झाला.

(हेही वाचा – Heavy Rain : मुंबईत आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार)

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अल्कारेजने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या जोकोव्हिचची सलग ३४ विजयांची मालिकाही खंडित केली. चॅम्पियनशिपमध्ये फक्त १२ वा सामना खेळणाऱ्या स्पॅनिश तरुण कार्लोस अल्कराझचे हे पहिलेच विम्बल्डन (Wimbledon Final 2023) विजेतेपद आहे. तर टेनिसमधील हे त्याचे दुसरे ग्रँडस्लॅम आहे, त्याने गेल्या वर्षी यूएस ओपन आपल्या नावावर केली.

अल्कराझविरुद्ध खेळणे आव्हानात्मक!

‘‘तू अप्रतिम सव्‍‌र्हिस केली आणि मोक्याच्या क्षणी गुण मिळवले. त्यामुळे तू हा सामना जिंकणे हा योग्यच निकाल आहे. तुझे अभिनंदन. मला लाल मातीच्या आणि हार्ड कोर्टवर तुझ्याविरुद्ध खेळताना आव्हान जाणवत होतेच. आता ग्रास कोर्टवरही तू चांगला खेळ करत आहेस,’’ अशा शब्दांत अंतिम लढतीनंतर जोकोव्हिचने अल्कराझच्या (Wimbledon Final 2023) खेळाचे कौतुक केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.