- ऋजुता लुकतुके
दोन सेट गमावल्यानंतर तगडी झुंज देत अमेरिकन टेलर फ्रिट्झने जर्मन झ्वेरेवचा पराभव केला. आतापर्यंत झ्वेरेवने आपल्या तगड्या सर्व्हिसने गाजवली होती. पण, अमेरिकन युवा खेळाडूने त्याला चांगलंच जेरीला आणला. फ्रिट्झने पहिले दोन सेट ४-६ आणि ६-७ असे गमावले होते. झ्वेरेवच्या खेळावर आधीच्या सामन्यात झालेल्या दुखापतीचं कुठलंही चिन्ह दिसत नव्हतं. आधीच्या सामन्यात त्याचा गुडघा दुखावला होता. पहिले दोन सेट त्याची सर्व्हिसही नेहमीसारखी होती. (Wimbledon 2024)
पाचव्या सेटमध्येही १-२ असा मागे असताना त्याने २१ फटक्यांची रॅली जिंकून पुन्हा बरोबरी साधण्यात यश मिळवलं. पण, त्यानंतर मोक्याच्या क्षणी झ्वेरेवने पुन्हा दुहेरी चूक केली आणि तिचा फटका त्याला बसला. याउलट तिसऱ्या सेटमध्ये ४-४ बरोबरीनंतर फ्रिट्झला जी लय सापडली ती त्याने शेवटपर्यंत टिकवून ठेवली. अखेर टेलर फ्रिट्झने हा सामना ४-६, ६-७, ६-४, ७-६ आणि ६-३ असा विजय मिळवला. (Wimbledon 2024)
FIVE STAR FRITZ ⭐️⭐️⭐️⭐️⭐️
Taylor Fritz comes from two sets down to beat No.4 seed Alexander Zverev 4-6, 6-7(4), 6-4, 7-6(3), 6-3#Wimbledon pic.twitter.com/gGKWZ61NlY
— Wimbledon (@Wimbledon) July 8, 2024
(हेही वाचा – Dadar : केशवसुत उड्डाणपुलाखालीत गाळ्यात महापालिकेच्यावतीने दिली जाणार ‘ही’ सुविधा)
दुसरीकडे अव्वल खेळाडू नोवाक जोकोविचनेही उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. तुलनेनं त्याचा सामना सोपा होता. होल्हर रुनचा त्याने ६-३, ६-४ आणि ६-३ असा फडशा पाडला. ३७ वर्षीय जोकोविच नुकताच गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतून सावरला आहे. तो नीकॅप लावूनच मैदानात उतरला. पण, खेळण्यात कुठलंही अवघडलेपण नव्हतं. उलट तो पूर्ण जोमाने मैदानात उतरला आणि प्रतिस्पर्ध्याला त्याने संधीच दिली नाही. (Wimbledon 2024)
Only eight remain ✨#Wimbledon pic.twitter.com/gbvPVCv5Zy
— Wimbledon (@Wimbledon) July 8, 2024
३७ वर्षीय जोकोविच आपल्या २५ व्या विक्रमी ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. आता उपांत्यपूर्व सामन्यात जोकोविचची लढत ॲलेक्स डीमोरशी होणार आहे. तर यानिक सिनर मेदवेदेवशी भिडेल. अल्काराझचा मुकाबला पॉलशी होणार आहे. तर टेलर फ्रिट्झचा मुकाबला मुसेटीशी होणार आहे. (Wimbledon 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community