Wimbledon 2024 : दिग्गज इंग्लिश खेळाडू अँडी मरे दुहेरीतील पराभवानंतर निवृत्त

Wimbledon 2024 : अँडी मरेचा दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभव झाला आहे.

63
Wimbledon 2024 : दिग्गज इंग्लिश खेळाडू अँडी मरे दुहेरीतील पराभवानंतर निवृत्त
  • ऋजुता लुकतुके

ग्रेट ब्रिटनचा दिग्गज टेनिसपटू अँडी मरे ३७ व्या वर्षी विम्बल्डनच्या हिरवळीवर हजारो प्रेक्षकांसमोर निवृत्त झाला आहे. दुहेरीत तो आपला भाऊ जिमी मरेबरोबर उतरला होता. पण, पहिल्याच फेरीत झालेल्या पराभवानंतर भावूक झालेल्या मरेला प्रेक्षकांनी मानवंदना दिली. १५ दिवसांपूर्वी मरे पाठीच्या कण्यावर झालेल्या शस्त्रक्रियेतून उठला आहे. त्याच्या मणक्यात एक गाठ झाली होती. या दुखापतीमुळे तो एकेकरीत खेळू शकला नाही. पण, विम्बल्डनमध्ये शेवटचा सामना खेळायचा या गोष्टीवर मरे ठाम होता. त्यामुळे त्याने दुहेरीचा पर्याय स्वीकारला. (Wimbledon 2024)

ऑस्ट्रेलियाच्या रिंकी हिजिकाटा आणि जॉन पिअर्स या जोडीने मरे बंधूंचा ७-६, ६-४ असा पराभव केला. अँडी मरेनं सामन्यात शर्थीचे प्रयत्न केले. प्रेक्षकांमध्ये मरेची पत्नी किम, मुली एडी व सोफिया तसंच दोन्ही पालक उपस्थित होते. २०१३ मध्ये अँडी मरेनं विम्बल्डन पहिल्यांदा जिंकलं तेव्हा ७७ वर्षांत ही मानाची स्पर्धा जिंकणारा तो पहिला ब्रिटिश ठरला होता. (Wimbledon 2024)

(हेही वाचा – Budget 2024-25 : आगामी अर्थसंकल्पात प्रमाणित वजावट एक लाखांवर आणणार?)

त्यानंतर मरेनं २०१६ मध्ये पुन्हा एकदा विम्बल्डन स्पर्धा जिंकली. तर २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये घरच्या प्रेक्षकांसमोर त्याने ऑलिम्पिक सुवर्ण पटकावलं. २०१२ मध्ये त्याने युएस ओपनही आपल्या नावावर केलं. मरेच्या शेवटच्या सामन्यानंतर एक छोटेखानी कार्यक्रम विम्बलडनच्या सेंटर कोर्टवर पार पडला. यासाठी जॉन मेकॅन्रो, नोवाक जोकोविच, मार्टिना नवरातिलोवा आणि कोंचिता मार्चिनेझ हजर होते. (Wimbledon 2024)

मरेचे आघाडीचे प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांनीही व्हीडिओ संदेशाद्वारे मरेला शुभेच्छा दिल्या. (Wimbledon 2024)

मरेनं या सामन्यानंतर प्रेक्षकांशी संवाद साधला. ‘मनाला वाटतं सतत खेळत रहावं. पण, शरीराला कळतंय की, हे शक्य नाही.पण, या खेळाने अनेक संस्मरणीय क्षण आणि धडे दिले आहेत. त्याच्या आधारे पुढील आयुष्य सुखात जाणार आहे.’ (Wimbledon 2024)

२०१९ च्या कठीण हिप शस्त्रक्रियेनंतर अँडी मरेची आंतरराष्ट्रीय स्तरावर पिछेहाट झाली. तो नियमितपणे खेळूही शकलेला नाही. (Wimbledon 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.