Wimbledon 2024 : युक्रेनची एलिना स्वितोलिनाची उपउपांत्य फेरीत धडक

Wimbledon 2024 : स्वितोलिना या अख्ख्या स्पर्धेत काळी फित लावून खेळत आहे.

109
Wimbledon 2024 : युक्रेनची एलिना स्वितोलिनाची उपउपांत्य फेरीत धडक
  • ऋजुता लुकतुके

युद्धजन्य युक्रेनची टेनिसपटू एलिना स्वितोलिनाने विम्बल्डन स्पर्धेत महिलांच्या उपउपांत्य फेरीत धडक दिली आहे. तिने चीनच्या वाँग शिनयुचा ६-२ आणि ६-१ असा पराभव केला. खेळताना आक्रमक भासणारी स्वितोलिना सामना संपल्यावर मात्र नेहमीच आपल्या भावनांना वाट मोकळी करून देते. युक्रेनवर लादलेल्या युद्धाचा निषेध म्हणून ती काळी फित लावून मैदानात उतरते आणि आपल्या भावना सामन्यानंतर उघडपणे मांडते. (Wimbledon 2024)

तिचा उपउपांत्य फेरीचा सामना सुरू असताना कीव इथं लहान मुलांच्या रुग्णालयावर क्षेपणास्त्रांचा हल्ला झाल्याची बातमी आली. या हल्ल्याने ती व्यथित झाली होती. पण तिची व्यथाच सध्या मैदानावर त्वेषाच्या रुपात बाहेर पडत आहे. सामना एका तासाच्या आत जिंकल्यावर तिला रडू आवरलं नाही आणि आपला विजय हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांना तिने समर्पित केला. (Wimbledon 2024)

(हेही वाचा – Worli Hit And Run प्रकरणी अखेर मिहीर शाहला अटक; 12 जणही पोलिसांच्या ताब्यात)

आता तिची गाठ गतविजेती एलिना रिबेकिनाशी पडणार आहे. ‘माझी कामगिरी चांगलीच झाली. पण, मायदेश युक्रेनसाठी हा दिवस कठीण आहे,’ असं म्हणत रॉयटर्सशी बोलताना तिला रडू आवरलं नाही. स्पर्धेत पहिल्या फेरीपासून ती दंडावर काळी फित बांधतेय. स्पर्धेत स्वितोलिनाला २१ वं मानांकन मिळालंय. पण, हिरवळीच्या कोर्टवर तिची कामगिरी चांगली आहे. गेल्यावर्षीही तिने स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. (Wimbledon 2024)

‘दिवसा ढवळ्या रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्याची बातमी आल्यावर सामन्यावर लक्ष केंद्रीत करणं खूपच कठीण गेलं. माझ्या देशात भर दिवसा हल्ला झालाय आणि यात किमान ३६ नागरिक मारले गेले आहेत. लहान मुलांचा जीव गेला आहे,’ असं स्वितोलिना सामन्यानंतर म्हणाली. (Wimbledon 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.