- ऋजुता लुकतुके
विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत महिलांमधील दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू कोको गॉफला पराभवाचा धक्का बसला आहे. तर पुरुषांमध्ये यानिक सिनर आणि कार्लोस अल्काराझलाही उपउपांत्य फेरीसाठी थोडफार झगडावं लागलं. डॅनिएल मेदवेदेवनेही आपली आगेकूच कायम ठेवली आहे. कोको गॉफच्या पराभवामुळे महिलांमध्ये पहिल्या दहा खेळाडूंतील फक्त दोघींचं आव्हान यंदा स्पर्धेत आता बाकी आहे. (Wimbledon 2024)
कोको गॉफला अमेरिकेच्या एमा नेवारोनं ४-६ आणि ३-६ ने हरवलं. १९ वर्षीय नेवारोसाठी हा सामना फारसा कठीण गेला नाही. दोन्ही सेटमध्ये मिळून एकूण तीनदा तिने कोकोची सर्व्हिस भेदली. एव्हारो जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानावर आहे. आणि कोकोविरुद्ध सुरुवातीपासून तिने वर्चस्व ठेवलं होतं. कोकोने यावर्षी अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपान्त्य फेरीत मजल मारली होती. पण, विम्बल्डनमध्ये तिला सूरच गवसला नाही. एव्हाराच्या जोरकर सर्व्हिससमोर तिची मात्रा चालली नाही. (Wimbledon 2024)
“Really grateful to be out here on Centre Court”
Reaching your first ever Grand Slam quarter-final on Centre Court against the No.2 seed – well played, Emma Navarro 👏 pic.twitter.com/G6ArNnvZxy
— Wimbledon (@Wimbledon) July 7, 2024
(हेही वाचा – Abhishek Sharma : झिंबाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यातील शतकवीर अभिषेक शर्मा )
पुरुषांमध्येही गतविजेते यानिक सिनर आणि कार्लोस अल्काराझ यांना उपउपांत्य फेरीसाठी झगडावं लागलं. अल्काराझची स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश करण्याची ही नववी खेप आहे. पण, युगो हर्मर्टने त्यासाठी त्याला चार सेट झुंजवलं. शेवटी अल्काराझचा ६-३, ६-४, १-६ आणि ७-५ असा पराभव केला. आधीच्या सामन्यातही त्याला पाच सेटपर्यंत झुंजावं लागलं होतं. रविवारीही त्याने ३३ नाहक चुका केल्या आणि ५ वेळा त्याची सर्व्हिस भेदली गेली. (Wimbledon 2024)
दुसरीकडे अव्वल खेळाडू यानिक सिनरने उपउपांत्य फेरी गाठताना बेन शेल्डनचा ६-२, ६-४ आणि ७-६ असा पराभव केला. तिसरा सेट सिनर गमावता गमावता राहिला. या विजयामुळे अव्वल मानांकित सिनरने स्पर्धेतील आपली आगेकूच कायम ठेवली आहे. यंदा ग्रासकोर्टवर ग्रँडस्लॅम जिंकून मानाची विम्बल्डन स्पर्धा जिंकणारा पहिला इटालियन होण्याचा त्याचा मानस आहे. (Wimbledon 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community