Women’s Asia Cup 2024 : आशिया चषक स्पर्धेत भारतीय महिला संघाची विजयाची हॅटट्रीक

Women’s Asia Cup 2024 : भारतीय महिलांनी नेपाळचा ८२ धावांनी दणदणीत पराभव केला 

128
Women’s Asia Cup 2024 : आशिया चषक स्पर्धेत भारतीय महिला संघाची विजयाची हॅटट्रीक
Women’s Asia Cup 2024 : आशिया चषक स्पर्धेत भारतीय महिला संघाची विजयाची हॅटट्रीक
  • ऋजुता लुकतुके

शेफाली वर्माच्या (Shafali Verma) ४८ चेंडूंत ८१ धावा आणि त्यानंतर दीप्ती शर्मा (Deepti Sharma), अरुंधती रेड्डी (Arundhati Reddy) आणि राधा यादव (Radha Yadav) यांनी केलेली खणखणीत गोलंदाजी याच्या जोरावर भारतीय महिलांनी आशिया चषकात नेपाळच्या महिला संघावर ८२ धावांनी मात केली. स्पर्धेतील आपला सलग तिसरा विजय नोंदवला. पाकिस्ता, युएई आणि आता नेपाळ विरुद्ध नोंदवलेला विजयही मोठा आणि निर्णायक होता. दम्बुला इथं शेफाली आणि हेमलता यांनी भारताला पुन्हा एकदा दमदार सुरुवात करून दिली. दोघींनी १२२ धावांची भागिदारी केली. ती ही पहिल्या १३ षटकांतच. त्यानंतर जेमिमा रोड्रिग्सने (Jemimah Rodrigues) नाबाद २८ धावा केल्या. या तिघींमुळे भारतीय महिलांनी निर्धारित २० षटकांत ३ बाद १७६ धावा केल्या. (Women’s Asia Cup 2024)

(हेही वाचा- Pooja Khedkar ला खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर अडचणीत; महापालिकेचे चौकशीचे आदेश)

शेफाली पूर्ण फॉर्मात होती. पहिल्या चेंडूपासून ती मोकळेपणाने फटके मारत होती. १ षटकार आणि १२ चौकारांच्या सहाय्याने तिने ८१ धावा केल्या. मग असाच एक मोठा फटका खेळण्याच्या नादात ती मगरच्या चेंडूवर यष्टीचीत झाली. पण, तिच्या या अप्रतिम खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार तिलाच मिळाला. (Women’s Asia Cup 2024)

नेपाळचा डाव अडखळतच सुरू झाला. दुसऱ्याच षटकांत समझाना खडका ७ धावांवर बाद झाली. दुसरी सलामीवीर सीताराना मगरने १८ धावा केल्या. तीच नेपाळच्या धावसंख्येतील सर्वोच्च खेळी ठरली. बाकी फलंदाज फक्त हजेरी लावून परतले. इंदू बामराने १४, रुबिना छेत्रीने १५ तर बिंदू रावलने नाबाद १७ धावा केल्या. पण, एकीकडे बळी जात होते. दुसरीकडे आवश्यक धावगती वाढत होती. त्यामुळे अखेर निर्धारित २० षटकांत नेपाळचा संघ ९ बाद ९६ धावाच करू शकला. भारतीय महिलांचा ८२ धावांनी विजय झाला. (Women’s Asia Cup 2024)

(हेही वाचा- Metro 3 सुरू होण्यापूर्वीच स्थानकात भरले पाणी; कंत्राटदाराला ठोठावला दंड)

स्पर्धेची बाद फेरी आता सुरू होईल. येत्या शुक्रवारी २६ तारखेला भारतीय महिला आपला उपान्त्य फेरीचा सामना खेळणार आहेत. ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यांनंतर बाद फेरीचं चित्र स्पष्ट होईल. (Women’s Asia Cup 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.